Due to Corona Wedding hall's are closed in the sangali city 
पश्चिम महाराष्ट्र

कॉरोनमुळे इथली शहरातील मंगल कार्यालये बंद

सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनाने मंगल कार्यालयांना बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या कार्यालयांना आपली बुकिंग रद्द करावी लागली आहेत. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मंगल कार्यालये आणि केटरिंग असोसिएशनने घेतला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी साथीचे आजार प्रतिबंधक कायदा जिल्ह्यात लागू केला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सांगलीतील मंगल कार्यालयांनी आपले 31 मार्चपर्यंतचे बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला आहेत. त्याअंतर्गत नागरिकांनी समूह करून कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन केले होते. तसेच मंगल कार्यालयांना कार्यालय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मंगल कार्यालये आणि केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष भट यांनी कालच (रविवारी) व्हॉट्‌स ऍपवरून ही नोटीस असोसिएशनच्या सदस्यांना पाठवली आणि त्यानुसार कार्यालये बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. 31 मार्चपर्यंत विवाहाचे फार मुहूर्त नाहीत. मात्र वाढदिवस, एकसष्ठी, बारसे असे कार्यक्रम बरेच आहेत. त्यासाठी मंगलकार्यालयांकडे बुकिंग झाले आहेत. मात्र सध्याची कोरोनाचा संसर्गाची स्थिती पाहता अनेक कार्यक्रमांच्या यजमानांनी स्वत:च कार्यक्रम स्थगित करून तो पुढे ढकलला आहे. 

प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद

कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मंगल कार्यालय बंद केले आहे. पाच-सहा कार्यक्रमांचे बुकिंग होते ते रद्द करून ऍडव्हान्स परत दिला आहे. पुण्यातील एका पार्टीचा बारशाचा कार्यक्रम बुक होता, तो पार्टीने स्वत:च स्थगित केला, असेही होत आहे. समोरुनही प्रतिसाद मिळत आहे. 
- निखिल पुजारी, वाडीकर मंगल कार्यालय, विश्रामबाग 

असोसिएशनची बैठकीत होणार पुढील निर्णय

प्रशासनाचा आदेश आल्यावर सर्वांना तो कळवला आहे. मुळात बुकिंग झालेल्यांपैकी 80 टक्के जणांनी कार्यक्रम स्थगित अथवा रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे. पुण्यातील पार्टीने केलेले बुकिंग स्वत:च रद्द केले आहे. उद्या (मंगळवारी) गणेश मंगल कार्यालय येथे असोसिएशनची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये पुढील निर्णय घेण्यात येईल. 

- संतोष भट, अध्यक्ष मंगल कार्यालय अँड केटरिंग असोसिएशन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT