Due to increasing number of patients, more strict restrictions are possible: Collector Abhijit Chaudhary 
पश्चिम महाराष्ट्र

वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणखी कठोर निर्बंध शक्‍य : जिल्हाधिकारी अभिजित चौधरी

जयसिंग कुंभार

सांगली ः जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गतवर्षीच्या तुलनेत दोन महिन्यांतच पूर्वीच्या उच्चांकी रुग्णसंख्येचा टप्पा पार होऊ शकतो. नागरिकांनी दक्षता न घेतल्यास निर्बंध आणखी कठोर करावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिला. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या अनुषंगाने ते "सकाळ'शी बोलत होते. 


ते म्हणाले,""मार्च महिन्यातील कोरोना रुग्णसंख्या गतमहिन्याच्या तुलनेत चार पटीने अधिक आहे. गतवर्षी टाळेबंदी लागू झाल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आला होता. यावेळचा डबलिंग रेट चिंता वाटावा असा आहे. गेल्या काही दिवसांतील अनुभव असा सांगतोय की लोक कोरोना नियमावलीबाबत गंभीर नाहीत. गर्दी आणि समारंभाबाबतचे निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे हे निर्बंध आणखी कठोर करावे लागतील. तूर्त 15 एप्रिलपर्यंतचे आदेश दिले असले तरी गरज पाहून त्यातही सुधारणा कराव्या लागतील.'' 


ते म्हणाले,""जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. आठ ते सकाळी 7 पर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आदेश आहे. सिनेमा हॉल, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंटही रात्री 8 नंतर बंद असतील. लग्नकार्यासह गर्दीच्या सर्व कार्यक्रमांसाठी 50 व्यक्तींना मर्यादेत एकत्र येण्यास परवानगी असेल. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. हे नियम काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहे.

यापूर्वी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झालेली नाही. मात्र आता प्रतिव्यक्ती 1 हजार रुपये इतका दंड आकारला जाईल. मास्क नसेल तर 500 रुपये, थुंकीबहाद्दरांना 1 हजार रुपये इतका दंड केला जाईल. आपत्ती कायद्यान्वये कारवाईचे अधिकार संबंधित यंत्रणांना दिले आहेत. आठवडाभरात कोरोना नियमावलीसाठी कठोर अंमलबजावणी होईल. धार्मिक स्थळांबाबतही विश्वस्तांवर कोरोना नियमावलीची जबाबदारी असेल. गर्दी टाळण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपायोजना आणि सुविधा त्यांनीच दिल्या पाहिजेत.'' 


ते म्हणाले,""टाळेबंदीसारखा पर्याय अंतिमच असेल तथापि पंधरा एप्रिलपर्यंतची नियमावली जाहीर केलेल्या नियमावलीचाही फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. त्याआधी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊनच पुढील निर्णय होतील. सध्या राज्य सरकारकडून आलेल्या आदेशानुसारच जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे.'' 

जिल्हाधिकारी म्हणाले- 

  •  आठ ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी 
  •  आस्थापने रात्री 8 नंतर बंद करा 
  •  कार्यक्रमांसाठी 50 व्यक्तींची मर्यादा 
  •  अंत्यसंस्कारासाठी 20 हून अधिन लोक नकोत 
  •  

मग दंड भरा... 

  •  नियम मोडल्यास : 1000 रु. 
  •  मास्क नसल्यास : 500 रु. 
  •  थुंकीबहाद्दरांसाठी : 1000 रु. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT