पश्चिम महाराष्ट्र

प्रश्नप्रत्रिका वेळेत न पोचल्याने सध्याकाळी पाच वाजता परिक्षेला सुरुवात

गुरूदेव स्वामी

भोसे - मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात सुरू असलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका कमी पडल्याने इंग्रजी बुद्धिमत्तेचा दुपारी तीन वाजता सुरु होणारा पेपर संध्याकाळी सव्वा पाच वाजता सुरू झाला. तर
येथीलच लवटेवस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेतील आठवीच्या केंद्रावर मराठी गणित पेपरला सर्व विद्यार्थ्यांना डी सेटच्याच प्रश्नपत्रिका आलेने शिक्षण विभागाच्या गलथान कारभार समोर आला. विद्यार्थांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळणाऱ्या या विभागाबद्दल पालकातून संताप व्यक्त होत आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेतून यश मिळवण्यासाठी वर्षभर तासन् तास अभ्यास करणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण आल्याने विद्यार्थी तणावात दिसत होते. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस ए. बी. सी. व डी अश्या प्रश्नपत्रिका येणे अपेक्षित होते. लवटवस्ती येथील केंद्रावर दुपारच्या पेपरला फक्त डी सेटच्या प्रश्नपत्रिका आल्यामुळे एकच गोधळ उडाला. ऐनवेळी काहीच करता येत नसलेमुळे तशाच प्रश्नपत्रिका वाटून परीक्षा घेण्यात आली. या दोनही गोष्टीचा गंभीर परिणाम नंदेश्वर केंद्रातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार असून, त्यात त्यांची संपादणूक पातळी खालवण्याची शक्यता असल्याने असा गलथान कारभार करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. दुष्काळी परिस्थिती असलेल्या या भागात प्रश्न पत्रिकेचा दुष्काळ करून परिक्षा विभागाने आपल्या कारभाराचा नमुना ठेवला
.
शिष्यवृत्ती परीक्षेचा आज पर्यंतचा  अनुभव पाहता दरवर्षी वाढीव प्रश्नपत्रिका येतात. पण या वर्षी प्रश्नपत्रिका वाढीव न येता नंदेश्वर येथील परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका कमी पडण्याचा प्रकार घडला आहे. याची सर्व माहिती आम्ही वरिष्ठांकडे पाठविली आहे.
लक्ष्मीकांत कुमठेकर, शिक्षण विस्ताराधिकारी

प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या अगोदर दहा मिनिटे सर्वांसमोर फोडण्याचे आदेश असलेने दुपारी पेपर सुरू होण्यापूर्वी गट्टा फोडलेनंतर 81प्रश्नपत्रिका कमी असल्याचे निदर्शनास आले नतर शिक्षणअधिकाऱ्यानी आदेशानुसार मंगळवेढा येथुन झेरॉक्स काढून आणून वाटल्या त्यामुळे परीक्षा सुरू होण्यास विलंब झाला.
- विठ्ठल बोरकर केंद्रसंचालक

माझा मुलगा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसला होता परंतु प्रश्नपत्रिका वेळेत देणे परीक्षा वेळेत घेणे हे परीक्षा विभागाचे जबाबदारी असताना देखील तब्ब्बल दोन तास पेपर उशीरा देणे  म्हणजे ही फार मोठी चूक असून याची सखोल चौकशी व्हावी. 
- विलास जोध पालक भोसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT