cotton.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शासनाच्या जाचक अटींमळे `या जिल्ह्यात कापूस पडून 

सकाळवृत्तसेवा

सलगरे,( जि. सांगली) ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मिरज तालुक्‍यातील खटाव येथील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादित केलेल्या पांढऱ्या शुभ्र कापसाला शेजारच्या कर्नाटक राज्यात मुधोळ, बैलहोंगल, विजापूर, गोकाक याठिकाणी बाजारपेठ उपलब्ध असताना राज्य सरकारच्या परवानगी शिवाय कापूस याठिकाणी विक्री करता येत नसल्याने हजारो टन कापूस विक्रीविना पडून आहे. एकतर सांगली जिल्ह्यात बाजारपेठ किंवा कापूस खरेदीकेंद्र सुरू करावे अन्यथा कर्नाटकात विक्रीची परवानगी मिळावी, अशी मागणी खटाव येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव आणि अखंड सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे खटाव येथील 15 हेक्‍टरापेक्षा जास्त क्षेत्रातील हजार क्‍विंटल कापूस पडून असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मिरज पूर्व भागातील खटाव परिसरात अनेक वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेत असतात. यामुळे सांगली जिल्ह्यात कापसाचे उत्पादन घेणारे खटाव हे एकमेव गाव आहे. गावातील कापूस उत्पादक शेतकरी कर्नाटकातील विजापूर, गोकाक, बैलहोंगल आदी ठिकाणाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविले जाते. काही वेळा तेथील व्यापारी जागेवर येऊन कापूस खरेदी करून नेत असतात. परंतु लॉकडाऊनमुळे यावेळी गावामध्ये सुमारे दोन हजार क्विंटलपेक्षा जास्त उत्पादित झालेला कापूस विक्री विना पडून आहे. जास्त कापूस उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांनी दर वाढेल या उद्देशाने ठेवलेला कापूस कोरोनाच्या महामारीत अडकला आहे. 

सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगलीमध्ये किंवा महाराष्ट्रात जवळ कुठेही कापूस विक्रीसाठी बाजारपेठ नसल्यामुळे कर्नाटकमध्ये जवळ असणाऱ्या विजापूर, गोकाक, बैलहोंगल या बाजारपेठेच्या ठिकाणी कापूस विक्री करण्यास किंवा कर्नाटकातील व्यापाऱ्यांना कापसाची खरेदी करण्यास महाराष्ट्रात परवानगी द्यावी किंवा सांगली मध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी खटाव व इतर ठिकाणच्या कापूस उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे. 

सांगली जिल्हयात कापूस खरेदी केंद्र स्थापन केल्यास जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येईल. 
सोमलींग जोडगे, शेतकरी 


लॉंकडाऊनमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे.विक्रीसाठी यावर्षी कर्नाटकातील व्यापाऱ्यांना खरेदी करण्यास परवानगी देऊन शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे 
सोमलिंग पुजारी, शेतकरी  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT