due to political leaders maratha reservation postponed sambhaji bhide says marathi news politics  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Bhide : राजकारण्यांमुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लांबली - संभाजी भिडे

संभाजी भिडे : सांगलीत साखळी उपोषणास पाठिंबा

अमोल गुरव

- अमोल गुरव

सांगली : राजकारणी लोक लबाड आहेत. त्यांच्यामुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लांबली. हिंदुस्थानचा प्राण महाराष्ट्रमध्ये म्हणजे मराठा समाजात आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नक्की सुटणार अशी प्रतिक्रिया प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी व्यक्त केली.

सांगलीत शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषण स्थळी जाऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन चिघळता कामा नये. जरांगे पाटील मनामध्ये वेगळा हेतू ठेवून काही करत नाही. मराठा समाजाचे नेतृत्व जरांगे पाटील यांच्याकडेच राहावे याची काळजी घेतली पाहिजे.

ते म्हणाले, राजकारणामुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लांबली आहे. आत एक बाहेर एक बोलणारे राजकारणी लोक लांब ठेवले पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी माणसे आहेत,

ही माणसे लबाडी करणार नाहीत. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नक्की सुटणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी हणमंत पवार, नितीन काळे, प्रताप बानकर, अण्णासाहेब थोरात, बाळासाहेब मेंगाने, अमित करमुसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT