पश्चिम महाराष्ट्र

हजारोंच्या उपस्थितीत वाईत दुर्गा दौडची सांगता 

सकाळ वृत्तसेवा

वाई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमाची येथे विजयादशमीला मोठ्या उत्साहात व हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. 

प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात दुर्गा दौडचे आयोजन करण्यात येते. तालुक्‍यात 35 गावांत एकाच वेळी शिवप्रतिष्ठानचे धारकऱ्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात दुर्गा दौडचे आयोजन केले. विजयादशमीला दुर्गा दौडची सांगता झाली. काल सकाळी नऊ वाजता महागणपती घाटावरून आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते महागणपतीची आरती व ध्वजाचे पूजन करून, प्रेरणा मंत्राने अतिशय उत्साही वातावरणात दुर्गा दौडचा प्रारंभ करण्यात आला. माजी खासदार उदयनराजे भोसले व माजी आमदार मदन भोसले यांनीही ध्वजाचे पूजन करून धारकाऱ्यांशी संवाद साधला. भगवे फेटे बांधून हजारो धारकरी उपस्थित राहिल्याने संपूर्ण महागणपती घाट भगवामय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा मंत्राने वृद्धांपासून तरुणांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.
 
या वेळी उपाध्यक्ष अनिल सावंत, विजयाताई भोसले, संदीप जायगुडे, संदीप साळुंखे, संतोष काळे, दीपक ओसवाल, भारत खामकर, भैया डोंगरे, अजित शिंदे, महेंद्र धनवे, काळूराम गुरव, किशोर भोसले, दीपक हजारे, राजेंद्र तांबेकर, आप्पा मालुसरे, विजयसिंह नायकवडी, सतीश ओतारी, तानाजी चंद्रकांत भोसले, गणेश जाधव, विवेक भोसले, हिंदुराव सुळके, सचिन खरात, दिनेश खैरे, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दुर्गा दौडचे नियोजन करण्यात आले.

अग्रभागी भव्य भगवा ध्वज त्यापाठीमागे तलवार शस्त्रधारी, भालावाले, नववारी साड्या नेसून महिला व मुली, लहान मुले फेटा बांधून त्यांच्या पाठी सर्व धारकरी शिस्तीने चालले होते. गणपती घाटावरून, गंगापुरी शाहीर चौक, भगवा कट्टा, नगरपालिका, भाजी मंडई, दातार दवाखाना, चावडी चौक, रविवार पेठ, जामा मशिदीवरून, यंग रविवार चौकातून ब्राह्मणशाहीतून किसन वीर चौक, चित्रा टॉकीजमार्गे महागणपती पुलावरून सिद्धनाथवाडी, एसटी बस स्थानकाजवळून पोलिस ठाण्यावरून सोनगीरवाडीत यात्रा मैदानावर सांगता करण्यात आली.

या वेळी चौकाचौकांत महिलांनी ओवाळून दुर्गा दौडचे भव्य स्वागत केले. सुमारे दहा हजार धारकऱ्यांनी दुर्गा दौडमध्ये सहभाग नोंदविला होता. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे व त्यांच्या सहकार्यांनी बंदोबस्त चोख ठेवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT