mseb bill.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

वीज बिल तक्रारीचे निरसन करण्यासाठी ई-मेल, मोबाईल क्रमांक

सकाळवृत्तसेवा

सांगली-  वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही ग्राहकांचे समाधान न झाल्यास ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावरून तक्रारीचे निरसन केले जाणार आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन काळात मिटर रिडिंग व बिल वाटप बंद होते. एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीज वापराची बिले दिली गेली. जून 2020 पासून प्रतिबंधक क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सूचनांचे पालन करून मिटर रिडिंग घेतले जात आहे. तसेच बिलांचे वाटप केले जात आहे. जूनची बिलाची रक्कम जास्त दिसत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्याचे निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने एक लिंक दिली आहे. तसेच कार्यालयात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

क्षेत्रीय कार्यालयात ग्राहक मदत कक्ष स्थापन केला आहे. ग्राहकांशी वेबिनार आणि फेसबुक लाईव्ह संवाद साधला जात आहे. मिटर रिडिंग व बिल वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. महावितरणकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनातून ग्राहकांचे समाधान न झाल्यास energyminister@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर तसेच मोबाईल क्रमांक 9833567777 आणि 9833717777 या क्रमांकावरून तक्रारीचे निरसन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

Solapur News: 'तत्काळ तिकीट बुकिंगचा प्रवाशांना जाणार ओटीपी'; रेल्वे प्रशासनाचा माेठा निर्णय, वाचा सविस्तर..

शिल्पकलेचे 'भीष्माचार्य' हरपले! पद्मभूषण राम सुतार यांचं निधन

धक्कादायक! सांगलीतील ईश्‍वरपुरात अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार; तोंड दाबून धरलं आणि हॉस्पिटल मागच्या उसाच्या शेतात नेत...

Kolhapur Municipal : सात हजारांवर मते; ‘मी सेफ’चा भ्रम संपला! चार सदस्यीय प्रभागरचनेने पालिकेचे गणित पालटले

SCROLL FOR NEXT