Animals Ear Tagging esakal
पश्चिम महाराष्ट्र

जनावरांना 'ईअर टॅगिंग' 31 मार्चपर्यंत बंधनकारक; 1 जूननंतर टॅगिंगशिवाय खरेदी-विक्री राहणार बंद

केंद्र शासनाच्या (Central Government) पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन (NDIM) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे.

पोपट पाटील

या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत.

इस्लामपूर : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून (Animal Husbandry Department) जनावरांना कानावर शिक्के (Ear Tagging) ३१ मार्चपर्यंत बंधनकारक करण्यात आले आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर शिक्के’ असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या (Central Government) पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन (NDIM) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. त्यामुळे जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.

या माहितीच्या आधारे शेतकरी, पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजना, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय, या नोंदणीमुळे जनावरांमधील होणाऱ्या विविध आजारांची आगाऊ माहिती मिळाल्याने अन्य परिसरात प्रतिबंधात्मक उपाय राबवून पशुधनाची जीवित हानी टाळता येणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा ईअर टॅग काढू नये अथवा तोडू नये. जनावराचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नवीन खरेदी केली असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी. भविष्यामध्ये येणाऱ्या पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.

-डॉ. अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सांगली

हे महत्त्वाचे..

  • कत्तल रोखण्यासाठी चोरून जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर बंधन येणार

  • कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार, जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे.

  • नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसान भरपाई मिळणार नाही.

  • जनावरांच्या विक्रीकरिता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन सहायक आयुक्त आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण पशुधन :

  • गाय वर्ग ३ लाख २४ हजार ७५६

  • म्हैस वर्ग ४ लाख ९३ हजार ९९८

  • शेळी वर्ग ४ लाख ५४ हजार १२५

  • मेंढी वर्ग १ लाख ३० हजार ७५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT