walse patil photo 
पश्चिम महाराष्ट्र

अगोदर झेंडावंदन मग सोलापूरचे "नियोजन' 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील 25 व 26 जानेवारी रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येतील अशी प्राथमिक माहिती आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे झेंडावंदन करून पालकमंत्री वळसे-पाटील त्याच दिवशी दुपारी जिल्ह्याचे नियोजन करणार आहेत. 
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक 26 जानेवारीला दुपारी 2 वाजता सातरस्ता येथील नियोजन भवनात होणार आहे. 
हेही वाचा - सोलापुरातील बंडखोरांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे ऍड. मराठे 
पालकमंत्री वळसे-पाटील यांचा पहिलाच सोलापूर दौरा आणि सोलापूर दौऱ्यातील पहिलीच बैठक रविवारी (ता. 26) होणार असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली महावितरणमध्ये कल्याण येथे झाली आहे. त्यांच्या जागेवर मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती झाली असून त्यांची आज पदभारही स्वीकारला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे व महापौरपदी श्रीकांचना यन्नम यांची निवड झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व महापौर हे नवीन चेहरे या बैठकीत पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: ठेकेदाराला सहा लाखाचा दंड

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT