Bribe case Sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेसह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

पावणे दोन लाख घेताना रंगेहात ताब्यात; अधीक्षक विजयकुमार सोनवणे याचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू मारूतीराव कांबळे (वय ५८) व त्याच विभागातील अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (४१) या दोघांना पावणे दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुपत विभागाने ही कारवाई केली. पदवीधर वेतन श्रेणी मान्यता देण्‍यासाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले. दरम्यान, जिल्हा परिषदेत झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी, की तक्रारदार व त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळणेबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे याच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षणाधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्र यांचेकडे प्रत्येकी साठ हजार रूपयांच्या लाच मागणी केली. याबाबतची तक्रार २६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. विभागाने या तक्रारीची दखल घेवून पडताळी केली. त्यावेळी शिक्षणाधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी प्रत्येकी साठ हजार प्रमाणे १ लाख ८० हजार रूपये लाचेची मागणी केली. चर्चेअंती १ लाख ७० हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे पाडताळणीत निष्पन्न झाले.

त्यानुसार जिल्हा परिषद आणि शिक्षणाधिकारी कांबळे याच्या घरासमोर सापळा लावला. तसेच सोनवणे याच्या कुपवाडमधील अहिल्यानगर येथेही सापळा रचण्यात आला होता. तक्रारदार यांनी सोनवणे याच्याकडे एक लाख सत्तर हजारांची रक्कम दिली. त्यानंतर शिक्षणाधिकारी कांबळे याच्या विश्रामबाग येथील कल्पतरू संकल्प सोसायटी येथे ही रक्कम दिल्यानंतर दोघांनाही रंगेहात कांबळे याच्या घरी पकडण्यात आले. दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत लाचलुचपतचे उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार अविनाश सागर, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, सलिम मकानदार, सिमा माने, संजय संकपाळ, सजय कलगुटगी, रविंद्र धुमाळ, राधिका माने, भास्कर भोरे यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT