Effect of of "Corona": Slower disbursement of crop  
पश्चिम महाराष्ट्र

"कोरोना' चा परिणाम : पीक कर्ज वाटप संथगतीने 

सकाळवृत्तसेवा

सांगली : "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' मुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपास थोडा विलंब झाला आहे. पीक कर्जाचे उद्दीष्ट एक हजार 557 कोटीचे असून मागील आठवड्यापर्यंत 193 कोटीचे कर्ज जिल्हा बॅंकेमार्फत वाटप करण्यात आले होते. तर राष्ट्रीयकृत बॅंकांकडून 68 कोटीचे कर्ज वाटप झाले. एकुण 261 कोटीचे वाटप मागील आठवड्यापर्यंत झाले. उद्दीष्टाच्या तुलनेत हे प्रमाण 18 टक्के इतके आहे.

उर्वरीत शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. 
गेले दोन महिने "कोरोना' मुळे लॉकडाउन आणि संचारबंदीचा अनुभव सर्वांनीच घेतला आहे. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात बॅंका बंद होत्या. दुसऱ्या टप्प्यात बॅंकांचे कामकाज सुरू झाले. परंतू सुरक्षेच्या दृष्टीने बॅंकांनी खबरदारी घेतल्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम झाला.

बॅंकांनी शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा थांबवू नये असे आदेश दिले होते. परंतू कोरोनाच्या भितीने बॅंकामध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी होती. तसेच बॅंकांचे कामकाजही ठराविक वेळेतच असल्यामुळे कर्ज वाटपाचे काम थोडे संथगतीने झाले. जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी एक हजार 557 कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बॅंका, सोसायट्या, राष्ट्रीयकृत बॅंकातर्फे कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरु करण्यात झाली आहे. मागील आठवड्यापर्यंत जिल्हा बॅंकेकडून 193 कोटीचे तर राष्ट्रीयकृत बॅंकेकडून 68 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. 

जिल्हा बॅंक आणि राष्ट्रीयकृत बॅंकेकडील ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्यांना पीक कर्ज मिळू लागले. मात्र अद्यापही अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीच्या लाभास पात्र ठरले नाहीत. त्यांना कर्जमाफीची आणि नवीन पीक कर्जाची प्रतिक्षा लागली आहे. तसेच शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहिर केले आहे. हे अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही. त्यामुळे अनुदानाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

"कोरोना' चा परिणामामुळे कर्ज वाटप प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागेल. खरीप हंगामाच्या तयारीसाठी सध्या शेतकऱ्यांना कर्जाची गरज भासू लागली आहे. गतवर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील कर्जवाटपाची स्थिती पाहिली तर जिल्हा बॅंकेचे कर्ज वाटप 38 कोटीनी कमी आहे. 
 

कर्ज वाटपास गती

कोरोना च्या संकटामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना सुरवातीच्या काळात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे कमी कर्ज वाटप झाले आहे. परंतू आता कर्ज वाटपास गती येईल.
- निळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सांगली
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT