Efficiency test
Efficiency test sakal
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षण खात्यातील तृतीय दर्जा कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार कार्यक्षमता परीक्षा

मिलिंद देसाई

बेळगाव : प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी तृतीय दर्जा कर्मचाऱ्यांची 100 गुणांची कार्यक्षमता परीक्षा (Efficiency test)घेतली जाणार आहे. याची सुरवात शिक्षण खात्यापासून(education department) केली जाणार असून शिक्षण खात्यातील तृतीय दर्जा कर्मचाऱ्यांना लवकरच कार्यक्षमता परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच येणाऱ्या काळात इतर खात्यातील कर्मचारी वर्गालाही कार्यक्षमता परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता आहे.

शिक्षण खात्याने तृतीय दर्जा कर्मचाऱ्यांची 100 गुणांची परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण केली असून शिक्षण खात्यामध्ये अनुकंपावर आधारीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना संगणक ज्ञान व इतर प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ही परीक्षा घेतली जाणार असून शिक्षण खात्यातर्फे भरती करतेवेळी नियमानुसार भरती झालेल्या तृतीय दर्जा कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही. मात्र अनुकंपावर आधारित भरती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. सध्या ही परीक्षा फक्त शिक्षण खात्याच्या कार्यालयातील तृतीय दर्जा कर्मचाऱ्यांसाठी घेतली जाणार आहे. मात्र येणाऱ्या काळात इतर खात्यामध्ये ही कार्यरत असणाऱ्या तुमची दर्जा कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षा घेण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे.

प्रशासकीय सुधारणा विभागाचे मुख्य सचिव एल के अतिक यांनी शिक्षण खात्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे स्वागत केले असून या परीक्षेमुळे प्रशासकीय कारभार सुधारण्यास मदत होईल त्यामुळे इतर विभागानीही अशा प्रकारची परीक्षा घ्यावी असे मत व्यक्त केले आहे. मात्र अनुकंपावर आधारित भरती झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना ही परीक्षा अवघड जाण्याची शक्यता असून परीक्षेचे स्वरूप अशा प्रकारचे असेल याची आगोदर माहिती द्यावी तसेच अभ्यास करण्यास वेळ द्यावा असे मत तृतीय दर्जा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होऊ लागले आहे. काही वर्षांपासून शिक्षण खात्यामध्ये तृतीय दर्जा कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेले नाही. मात्र अनुकंपावर आधारित 600 हुन अधिक कर्मचारी शिक्षण खात्यात सेवा बजावीत आहेत. त्यापैकी अनेक कर्मचारी कमी शिक्षण घेतलेले आहेत तसेच त्यांना सरकार व प्रशासकीय सेवेबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकदा समस्या निर्माण होत असल्याने शिक्षण खात्याने कार्यक्षमता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT