World Sparrow Day 2024
World Sparrow Day 2024 Sakal
पश्चिम महाराष्ट्र

World Sparrow Day 2024 : अंगणातील चिवचिवाट वाढवण्यासाठी हवेत सर्व स्तरातून प्रयत्न

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : हा घास चिवूचा, हा घास कावूचा म्हणत आपल्या चिमुकल्यांना घास भरवत चिमणीलासुध्दा घास भरवण्याची आपली अलिखीत परंपरा आहे. ती परंपरा आज संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चिमणी सारख्या पक्षाच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करून आपल्या अंगणातील चिवचिवाट वाढवण्याचा सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आपल्या जीवनचक्रामध्ये पशुपक्षी, प्राणी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु आजच्या धगधगत्या जीवनात मनुष्याने आपल्या स्वार्थासाठी इतर पशु पक्षावर अन्याय करीत आहेत. परंतु यामध्येही पशु-पक्षी यांवर प्रेम करणारी मंडळी आपल्या समाजात आहेत.

आजच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पशु पक्षांवर प्रेम करणारे, त्यांचे अस्तित्वासाठी झटणारे मंडळी आज उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत आहे. सांगोला तालुक्यात आम्ही प्राणी पक्षी प्रेमी ग्रुपच्या माध्यमातून पक्षांसाठी चारापाण्यासाठी विविध ठिकाणी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

यावर्षीचा उन्हाळा फार भयंकर समस्या घेवून आला आहे. 'प्राणिमात्रावर दया करा' म्हणण्यापलीकडे कोणीही काही करत नाहीत. हा घास कावूचा म्हणत आपल्या चिमुकल्यांना घास भरवत चिमणीलासुध्दा घास भरवण्याची आपली अलिखीत परंपरा आहे. ती परंपरा आज संपुष्टात आली आहे. कारण आता चिमणीचे दर्शनच दुर्लभ झाले आहे. प्रत्येकाच्या अंगणात जमिनीचा वाढवणे गरजेचे आहे.

'आम्ही प्राणी पक्षी प्रेमी' ग्रुपचे कार्य कौतुकास्पद -

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पिण्यास पाणी न मिळाल्याने चिमण्यांसारखे अनेक पक्षी उष्माघताला बळी पडतात. सांगोला महाविद्यालयांच्या प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. विधिन कांबळे यांना ही गंभीर बाब वाटल्याने अंगणात पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याविषयी आवाहन केले.

त्यांच्या या प्रयत्नाला यश आले व बघता-बघता शेकडो उत्साही मंडळी यामध्ये जोडले गेले. आज सांगोला शहराबरोबरच ग्रामीण भागातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ति पक्षी संवर्धनासाठी आपले योगदान देत आहेत.

'आम्ही प्राणी पक्षी प्रेमी' ग्रुपच्या माध्यमातून सांगोला तालुक्यात पक्षी संवर्धन, प्रबोधन आणि जनजागृतीचे कार्य अत्यंत जोमाने सुरू आहे. सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची तळमळ असणाऱ्या जवळपास 100 ते 150 व्यक्ति आपले योगदान देत असल्यामुळेच आज सांगोला तालुक्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो आहे.

डॉ. विधिन कांबळे यांनी सांगोला महाविद्यालायत विद्यार्थ्याच्या सहभागातून एक पथदर्शी प्रयोग करण्यात आला असून अनेक कृत्रिम घरटी बसवण्यात आली आहेत. गेली 5 ते 6 वर्ष या घरट्यातून शेकडो पक्षी आपल्या पिढीचा विस्तार करत असून महाविद्यालयाचा परिसर चिवचिवाटाने गजबजलेला असतो. नागरिकांना व पालकांना ही दृश्य खूप विलोभनीय व मनाला आनंद देणारे आहे.

सांगोला तालुक्याने अनेक पॅटर्न महाराष्ट्राला दिले आहेत. पेयजल योजना, डाळींब शेती, निर्मलग्राम अभियान, आशियाखंडातील गुणवत्तेत सर्वश्रेष्ठ सहकारी सुतगिरणी त्याच धर्तीवर आज तालुक्यात सुरु असणारा पक्षी सवंर्धनाचा सांगोला पॅटर्न महाराष्ट्रातील लोकांनी स्विकारावा

- राजेंद्र यादव, सदस्य, 'आम्ही प्राणी पक्षी प्रेमी' ग्रुप, सांगोला.

सांगोला तालुक्यात आम्ही पक्ष्यांसाठी त्यांच्या चाऱ्या पाण्यासाठी कृत्रिम घरट्यांचे वाटप केले आहे. या माध्यमातून अनेक ठिकाणी पक्षांसाठी चारा पाण्याची व्यवस्था झाली आहे. परंतु पक्षांसाठी उन्हाळ्यात चारा पाणी व्यवस्था करण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे

- विधीन कांबळे, प्राध्यापक, सांगोला महाविद्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT