corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कानकात्रेवाडीत एकाच दिवशी आठ "कोरोना' बाधित आढळले... पिंपरी बुद्रुकमध्ये एक बाधित

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली)- कानकात्रेवाडी (ता. आटपाडी) येथे आज एकाच दिवशी आठ तर एक पिंपरी बुद्रुक मध्ये एक कोरोना बाधित रुग्ण आढळला. अवघ्या चार दिवसात कानकात्रेवाडीतील महानवरवस्तीवर तब्बल बारा कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे संपूर्ण गाव आणि परिसरातील गावामध्ये भितीचे वातावरण आहे. हादरून गेली आहेत. आटपाडी तालुक्‍यातील आजअखेर कोरोनाग्रस्ताची संख्या 51 वर पोहोचली आहे. 

कानकात्रेवाडी येथे 24 जूनला गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून पाच जणांचे दोन कुटुंब एकाच गाडीतून आले होते. त्यांना होम क्वारंटाईन केले होते. यातील 48 वर्षीय पुरुषाला त्रास होऊ लागल्यामुळे तपासणीसाठी पाठवले असता त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला. यानंतर त्याच्या सोबत आलेल्या चौघांची तपासणी केली असता तिघांचा अहवाल "पॉझिटीव्ह' आला होता. संबंधित रुग्णाने होम क्वारंटाईनचे तंतोतंत पालन केले नव्हते. तो अनेकांच्या जवळून संपर्कात आला होता. तसेच एका अंत्यविधी कार्यक्रमाला ही गेला होता. त्यामुळे आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कातील एकोणीस जणांचे घशाचे स्त्राव तपासणीसाठी मिरजेला पाठवले होते. तर सत्तर जणांना होम क्वारंटाईन केले आहे. यातील आठ जणांचा अहवाल आज "पॉझिटिव्ह' आला. तर अकरा जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

पिंपरी बुद्रुक मध्येही मुंबईहून आलेला एकजण कोरोना बाधित असल्याचे आढळले. एकाच दिवशी तालुक्‍यात नऊ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी बुद्रुक येथील रूग्णाच्या संपर्कातील पाच जणांना तातडीने तपासणीसाठी आटपाडीला शासकीय वसतीगृहावर पाठवले. तर कानकात्रेवाडी येथे आज आढळलेल्या आठ लोकांच्या संपर्कातील 30 आणि गोमेवाडीतील पाच अशा 35 लोकांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना आटपाडीत वसतीगृहात आणण्याचे काम आरोग्य विभागाने गतीने सुरू केले होते. तालुक्‍यात आज 9 रुग्ण सापडल्यामुळे महसूल विभाग आणि आरोग्य विभागाची मोठी धावपळ उडाली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि बाहेरून आलेले कोरोना बाधीत आढळून येत होते. सध्या स्थानिक देखील कोरोना बाधित आढळत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT