RJA20A00872_pr.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आठ तलाव हाऊसफुल्ल ः पहा कुठे 

हिरालाल तांबोळी

घाटनांद्रे (सांगली)  ः कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यासह तालुक्‍यात गेली महिन्यात सलग पडणाऱ्या परतीच्या पावसाने तालुक्‍यातील बंधारे, ओढे, नाले यासह दहा लघु व एक मध्यम प्रकल्प अशा अकरा तलावांपैकी आठ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गेली अनेक वर्षात प्रथमच इतका पाऊस पडला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कवठेमहांकाळ तालुक्‍यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यातून बंधारे, ओढे, नाले, तलाव यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी साठा झाला. त्यातच गेली चार दिवसांपासून संततधार झालेल्या परतीच्या पावसाने त्यात आणखीन भर घातली आहे.

तालुक्‍यातील आठ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अद्यापही ढगाळ वातावरण असल्याने अजून पावसाची शक्‍यता आहे. अर्थातच तालुक्‍याच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान या पावसामुळे तालुक्‍यातील द्राक्षे व खरीप हंगामातील धान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचले आहे. पिकांची काढणी, मळणी, थांबली आहे.

त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. तालुक्‍यातील कुची, रायवाडी, लंगरपेठ, नांगोळे, दुधेभावी, घोरपडी, बंडगरवाडी हे लघु व मध्यम प्रकल्प बसाप्पावाडी असे आठ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर उर्वरीत लांडगेवाडी (10.75), बोरगाव (45. 85) व हरोली (45. 91) इतका द. ल. घ. फु. इतका पाणीसाठा झाला आहे.

एकीकडे भरपूर प्रमाणात पाणीसाठा त्यामुळे शेतकरी समाधानी तर दुसरीकडे नगदी पीक द्राक्ष व खरीप हंगामातील धान्य पिकांचे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. 

संपादन ः अमोल गुरव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT