Eight lakes in Kavthemahankal taluka were completely filled 
पश्चिम महाराष्ट्र

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील आठ तलाव पूर्ण भरले 

हिरालाल तांबोळी

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यासह तालुक्‍यात गेली महिन्यात सलग पडणाऱ्या परतीच्या पावसाने तालुक्‍यातील बंधारे, ओढे, नाले यासह दहा लघु व एक मध्यम प्रकल्प अशा अकरा तलावांपैकी आठ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गेली अनेक वर्षात प्रथमच इतका पाऊस पडला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कवठेमहांकाळ तालुक्‍यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यातून बंधारे, ओढे, नाले, तलाव यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी साठा झाला. त्यातच गेली चार दिवसांपासून संततधार झालेल्या परतीच्या पावसाने त्यात आणखीन भर घातली आहे. 

तालुक्‍यातील आठ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अद्यापही ढगाळ वातावरण असल्याने अजून पावसाची शक्‍यता आहे. अर्थातच तालुक्‍याच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान या पावसामुळे तालुक्‍यातील द्राक्षे व खरीप हंगामातील धान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचले आहे. पिकांची काढणी, मळणी, थांबली आहे.

त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. तालुक्‍यातील कुची, रायवाडी, लंगरपेठ, नांगोळे, दुधेभावी, घोरपडी, बंडगरवाडी हे लघु व मध्यम प्रकल्प बसाप्पावाडी असे आठ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर उर्वरीत लांडगेवाडी (10.75), बोरगाव (45. 85) व हरोली (45. 91) इतका द. ल. घ. फु. इतका पाणीसाठा झाला आहे. एकीकडे भरपूर प्रमाणात पाणीसाठा त्यामुळे शेतकरी समाधानी तर दुसरीकडे नगदी पीक द्राक्ष व खरीप हंगामातील धान्य पिकांचे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT