Election in 11 gram panchayats at Kavthemahankal Taluka; all political group recharge 
पश्चिम महाराष्ट्र

कवठेमहांकाळला 11 ग्रामपंचायतींसाठी धुमशान; काका, घोरपडे, सगरे, आमदार गट रिचार्ज

गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : गाव पातळीवर महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तेचे सिंहासन आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांसह राजकीय नेत्यांनी गतचा महिन्यापासूनच तयारी सुरू केली आहे.

तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. नववर्षात सत्तेच्या सिंहासनाचा बंपर धमाका कोणाकडे याकडे लक्ष लागले आहे. एकंदरीतच कोरोनामुळे स्थगित झालेल्या आणि गाव पातळीवर महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे कार्यकर्ते पुन्हा रिचार्ज होणार असल्याचे चित्र आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील अकरा ग्रामपंचायतीसाठी पुढील महिन्यात मतदान आहे. मोघमवाडी, नांगोळे, बनेवाडी, जांभुळवाडी, तिसंगी, चोरीची, इरळी, निमज, थबडेवाडी, रायवाडी आणि म्हैसाळ (एम) ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यंदा कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ दिली होती. निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

नेहमीच तालुक्‍यात प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे राजकीय प्रयोग पाहणारा कवठेमहांकाळ तालुका यंदा कोणते नवे राजकीय प्रयोग करणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांपासून वरिष्ठ नेतेही सत्तेचे सिंहासन ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांना बळ देत असतात. राजकीय संवेदनशील असलेल्या तालुक्‍यात प्रत्येक निवडणुकीत वेगळेच प्रयोग तालुक्‍यातील जनतेने पाहिले आहेत. 

आगामी होत असलेल्या तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत खासदार संजय पाटील गट, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट,राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील गट,महाकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे गट आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे लवकरच कळेल. तालुक्‍यात होत असलेल्या अकरा ग्रामपंचायतींमध्ये राजकीय ताकद वापरण्यासाठी हळूहळू तयारी सुरू झाली आहे.गतवर्षाचा निरोप घेऊन नवीन वर्षात गावपातळीवरील सत्तेचे सिंहासन नव्या वर्षात ताब्यात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना रिचार्ज करायला सुरुवात केली आहे.मात्र सत्तेचे सिंहासन कोणाकडे द्यायचे हे गावातील मतदार ठरवणार आहेत. 

ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम 

  • 23 ते 30 डिसेंबर 2020 - उमेदवारी अर्ज दाखल 
  • 31 डिसेंबर 2020 - छाननी 
  • 04 जानेवारी 2021 - उमेदवारी अर्ज मागे घेणे 
  • 15 जानेवारी 2021 - मतदान 
  • 18 जानेवारी 2021 - मतमोजणी 

तालुक्‍यातील अकरा ग्रामपंचायती (कंसात सदस्यसंख्या) 

मोघमवाडी (07) , नांगोळे (09), बनेवाडी (09) , जांभुळवाडी (07), तिसंगी (09) , रोची (09), इरळी (09) , निमज (07), थबडेवाडी (09) , रायवाडी (07) म्हैसाळ (एम) (07) . 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT