politics
politics esakal
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेस, भाजपसह राष्ट्रवादीही रिंगणात

सकाळ डिजिटल टीम

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मंत्री डॉ. विश्‍वजित कदम आणि माझे बोलणे झाले.

सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ अ च्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसह एकूण आठ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केले. आज छाननी होणार आहे; तर गुरुवारी (९) अर्ज माघार घेण्याची अखेरची मुदत आहे.

प्रभाग १६ अ मधून काँग्रेसचे माजी महापौर हारून शिकलगार निवडून आले होते. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे काँग्रेसने शिकलगार यांचे पुत्र तौफिक यांना उमेदवारी दिली. तौफिक यांनी उमेदवारी दाखल केली. या वेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, उत्तम साखळकर, मयूर पाटील, फिरोज पठाण, अमर निंबाळकर, संग्राम पाटील आदी उपस्थित होते. या वेळी इरफान शिकलगार यांचाही अर्ज दाखल करण्यात आला.

भाजपकडून अमोल गवळी यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग १६ मधील कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरल्याने भाजपने गवळी यांची उमेदवारी दाखल केली. या वेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नितीन शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नगरसेवक शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे, सुजित राऊत, दीपक माने आदी उपस्थित होते. भाजपकडून बालाजी काटकर यांनीही अर्ज दाखल केला आहे.

‘राष्ट्रवादी’ने उमर गवंडी यांचा अर्ज दाखल केला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, शिक्षण मंडळाचे माजी सभापती पद्माकर जगदाळे, असिफ बावा, ‘राष्ट्रवादी’चे शहर जिल्हा सदस्य समीर कुपवाडे, पद्मामाळचे सरपंच सचिन जगदाळे, मनोज भिसे आदी उपस्थित होते. या वेळी बादशहा पाथरवट यांचाही अर्ज दाखल करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीतर्फे याकूब पठाण यांनी, तर अमित पवार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.

"लढण्याच्या उद्देशानेच अर्ज दाखल केला आहे. इथल्या परिस्थितीची माहिती वरिष्ठांना दिली. प्रदेशकडून जो आदेश येईल, त्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाईल."

- दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

"प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मंत्री डॉ. विश्‍वजित कदम आणि माझे बोलणे झाले. ‘राष्ट्रवादी’ला सोबत घेण्याबाबत त्यांना माहिती दिली आहे. त्यांनी ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून या निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली."

- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

"राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी फडणवीसच..." भाजप आमदार म्हणाला, मी तर ओपन बोलतो

Yogi Adityanath: 2022 च्या निवडणुकांपूर्वी CM योगींना हटवण्याची झाली होती तयारी, 'या' पुस्तकात धक्कादायक दावा

Viral Video: मानवी बोटानंतर आता महिलेला ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीमध्ये सापडली गोम

T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

SCROLL FOR NEXT