election candidate used photography and logo to face problems candidate in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

निवडणूक उमेदवारांनी पक्षाचे चिन्ह वापरल्यास होणार आता गुन्हा दाखल

महेश काशिद

बेळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाचे चिन्ह वा नेत्यांचे छायाचित्र वापरण्यावर निर्बंध आहे. पक्षाची ओळख करून देणे किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा उमेदवार असल्याचे बिंबविण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारांवर गुन्हा नोंदविला जाईल. निवडणूक प्रचाराचे साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज दिला आहे. 

राजकीय पक्षांची सभा, समारंभ आयोजित करून त्याठिकाणी पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह वापरता येत नाही. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने पक्षाचे नाव घेऊन पाठिंबा मागणे किंवा स्वतःची ओळख करून देताना पक्षाचे नाव घेऊ नये. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी राजकीय नेत्यांचे छायाचित्र, पक्षाचे चिन्ह असलेले भिंत्तीपत्रक वाटता येत नाही. त्याशिवाय निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्रातून जाहिरात देताना पक्षाचे चिन्ह किंवा छायाचित्र वापरता येत नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. 


ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता जारी झाली आहे. इतर निवडणुकींच्या तुलनेत ही निवडणूक वेगळी आहे. त्याचे स्वरुप आणि संबंधीत नियम वेगळे आहेत. त्यासाठी याविषयीची माहिती उमेदवारांना निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर देण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज माघार प्रक्रिया पूर्ण संपल्यानंतर जाहीर निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात होते. या दिशेने पहिल्या टप्प्याची निवडणूक आता पुढे सरकत असुन दुसऱ्या टप्प्याची निवडणूक तयारी सुरु आहे. 

निवडणुकीत राजकीय पक्षांचे चिन्ह वा नेत्यांचे फोटो उमेदवारांना वापरता येत नाही. शिवाय राजकीय पक्षांनी उमेदवारांना पाठिंबा किंवा पक्षाचा उमेदवार असल्याचे बिंबविण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्यावेळी या स्वरुपाची जाहिरात किंवा महिती उपलब्ध झाल्यास कारवाईला सामोर जावे लागेल. निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार गुन्हा नोंदविला जाईल, असा इशारा हिरेमठ यांनी दिला आहे. तसेच कारवाई दरम्यान प्रचाराचे साहित्य निवडणूक अधिकारी जप्त करतील, त्याची नोंद घेण्यास कळविले आहे. 


 - राजकीय पक्षांचे चिन्ह, झेंडा वापरण्यास निर्बंध 

- राजकीय पक्षांचा उमेदवार अशी ओळख करून देऊ नये 

- राजकीय नेत्यांचे छायाचित्र वापरू नये 

- वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रातून जाहिरात देताना पक्षाचे चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरू नये 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

Mango Cashew Crop : अवकाळी हवामानाचा दुहेरी फटका; गारपीट, वादळ आणि वीज कोसळल्याने शेती व उद्योग दोन्ही संकटात

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा

Police Recruitment Success : जिद्द असेल तर आकाशही ठेंगणं! सोलापूरच्या ग्रामीण भागातील लेक बनली पोलिस; गरिबीतल्या संघर्षाची ही गोष्ट वाचून डोळे पाणावतील

Astrology : उद्या २९ मार्च! 'या' ५ राशीच्या लोकांना नशिबाची भक्कम साथ मिळणार; खूप धनलाभ होईल, नात्याला नवे वळण, करियरमध्ये यश

SCROLL FOR NEXT