Municipal Corporation Election Sakal
पश्चिम महाराष्ट्र

संकेश्वर प्रभाग 13 साठी पोटनिवडणूक

20 मे ला मतदान भाजप-काँग्रेसमध्ये चुरस

सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर: येथील प्रभाग 13 चे नगरसेवक संजय नष्टी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. राज्यभरात 11 ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. सोमवार (ता. 2) पासून निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. सोमवारी (ता. 2) ते सोमवार (ता. 9) मे अर्ज दाखल करणे, 10 मे रोजी अर्जाची छाननी, 11 मे रोजी अर्ज माघार, 20 मे रोजी मतदान व 22 मे रोजी निकाल असे निवडणूक वेळापत्रक आहे.

नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाला महिना उलटण्याच्या आत निवडणूक जाहीर झाली आहे. धडाडीचे नगरसेवक म्हणून शहरात त्यांची ख्याती होती. आता त्यांचा वारसदार कोण, हा प्रश्न निर्माण झाला असून सध्या भाजप व काँग्रेसमध्ये या जागेसाठी चुरस आहे. संजय नष्टी हे काँग्रेसमधून निवडून आले होते. त्यामुळे या जागेवर काँग्रेसचा हक्क आहे. याकरिता संकेश्वर घटक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडसी, कुणाल पोतदार, सनी पचंडी तर भाजपमधून बसवराज बागलकोटी, अॅड. संतोष नेसरी, शिवानंद उर्फ नंदु मुडसी यांची नावे चर्चेत आहेत. भाजप विरुद्ध काँग्रेस लढत निच्छित असून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांकडून कोणता उमेदवार निच्छीत केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये नष्टी परिवाराच्या सहानभुतीचाही विचार होऊ शकतो. मंत्री उमेश कत्ती, रमेश कत्ती व काँग्रेसचे नेते ए. बी. पाटील यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT