Eleven mistakes in the fifth scholarship questionnaire 
पश्चिम महाराष्ट्र

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चुकांची दहावी 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्‍नपत्रिकेत 11 प्रश्‍न चुकीचे निघाले. त्यावर विद्यार्थ्यांसह पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

 
पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील 338 केंद्रांवर घेण्यात आली. पाचवीचे 33 हजार 995, तर आठवीचे 21 हजार 491, असे 55 हजार 486 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत भाषा व गणिताचा पेपर झाला. त्याला पाचवीच्या 33 हजार 995 विद्यार्थ्यांपैकी 32 हजार 728 विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये भाषा व गणिताच्या पेपरमध्ये एकूण 11 प्रश्‍न चुकीचे आढळून आले.

हा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांना ही माहिती दिली. मात्र, लगेच दुसरा पेपर असल्याने पालकांनी मुलांना, त्याकडे दुर्लक्ष करून पुढील पेपरवर लक्ष देण्याची सूचना केली. त्यानंतर पालकांनी या चुकांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकांशी चर्चा केली. त्यामध्ये एकूण 11 प्रश्‍न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 


सोशल मीडियावर रात्री उशिरा सुरू झालेली चर्चा आज दिवसभर सुरू होती. चुकीच्या प्रश्‍नांचे गुण द्या, पुन्हा परीक्षा घ्या, ते प्रश्‍नच रद्द करा, आदी मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले जात होते. 


शिष्यवृत्ती परीक्षेत अधिक विद्यार्थी चमकावेत म्हणून जिल्हा परिषदेने विशेष लक्ष घातले आहे. त्याबरोबर शिक्षकांनीही वर्षभर कष्ट करून विद्यार्थी घडविले आहेत. त्यातच अशा चुका झाल्याने सर्वांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रश्‍नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हुशार विद्यार्थ्यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होती. 


शिष्यवृत्ती परीक्षेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. वर्षभर चांगला सराव करून घेतला गेला आहे; परंतु मुख्य प्रश्‍नपत्रिकेत असे होणे दुर्दैवी आहे. अशाने विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फिरते. 
- डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते 


पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्‍नपत्रिकेत 11 प्रश्‍न चुकलेले आहेत. त्यांचे गुण विद्यार्थ्यांना न देता ते प्रश्‍नच रद्द करावेत. 
- बापूसाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT