2Corona_25 
पश्चिम महाराष्ट्र

ते अकरा जण मिरजेतील क्वारंटाईनमध्ये 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः दिल्ली येथील निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तबलिगे ए-जमातीच्या मेळाव्यात समाविष्ट झालेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांना मिरजेतील क्रीडा संकुल येथील संस्था क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी चार जणांचे स्वॅबचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरित सात जणाच्या स्वॅबचे नमुने आज दुपारी पाठविले जाणार आहेत. 


तबलिगे ए-जमातीच्या मेळाव्यात समाविष्ट झालेल्यापैकी पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनाच्या हाती आली. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कात आलेले असे एकुण अकरा जणांची नावे पुढे आली आहेत. तासगाव, इस्लामपूर, मिरज आणि सांगली शहरातील ते असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्या अकरा जणांना मिरजेतील क्रीडा संकुल येथील संस्था क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडे कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, मात्र प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. 

हजरत निजामुद्दीन येथे तबलिगे ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास आतापर्यंत मिळाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 5, सोलापूर जिल्ह्यातील 17 व कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT