Sangli Helicopter Emergency Landing 
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Helicopter Emergency Landing : लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँण्डिंग; मोठा अनर्थ टळला

हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मिरज तालुक्यातल्या एरंडोलीमध्ये हे लँडिंग करण्यात आलंय.

रोहित कणसे

Sangli Helicopter Emergency Landing : खंडेराजुरी ता. नाशिकहून बेळगावला जाणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एरंडोली (ता. मिरज) येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास नाशिकहून बेळगावला औषधे घेऊन जाणारा भारतीय सैन्य दलाचा हेलिकॉप्टर एरंडोली येथे कमी उंचीवर आकाशात घिरट्या घालत होता. तांत्रिक बिघाड झालेला हेलिकॉप्टर सुरक्षित स्थळी उतरविण्यासाठी पायलट कडून चाचपणी करण्यात येत होती. त्यांना परशुराम हाके यांच्या शेतातील मोकळी जागा लँडिंग साठी सुरक्षित वाटल्याने हेलिकॉप्टरचा हाके यांच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

या हेलिकॉप्टरमध्ये लेफ्टनंट कर्नल, को पायलट व एक पायलट असे तिघे होते. या हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी तत्काळ सैन्य विभागाच्या तांत्रिक विभागास कळविण्यात आले. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नाशिकहून लष्कराचे दुसरे हेलिकॉप्टर तंत्रज्ञान आले यावेळी या हेलिकॉप्टरची पाहणी करून सुमारे दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर दुरुस्ती केली व दुपारी दोन वाजता दोन्ही हेलिकॉप्टर बेळगावच्या दिशेने रवाना झाले या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर हे घटनास्थळी फाट्यासह दाखल झाले. सैन्य दलातील हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एरंडोली, मल्लेवाडी सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT