Enlightenment from the speaker in sangli Islampur Coronadabad area 
पश्चिम महाराष्ट्र

Video - इस्लामपुरात कोरोनाबाधित परिसरात स्पीकरवरून प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : येथे ज्या परिसरात कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी लोकांमधील भीती कमी व्हावी यासाठी स्पिकरवरुन लोकांचे प्रबोधन आणि मनोरंजन केले जात आहे. त्यासाठी मार्गदर्शनपर माहिती आणि प्रेरणादायी भजन आदींचा वापर केला जात आहे. 

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे एकूण 23  कोरोनाबधित रुग्ण आढळल्याने अत्यंत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन येनकेन प्रकारे उपाययोजना राबवून लोकांना दिलासा देण्यासाठी धडपडत आहे. गांधी चौक आणि भाजी मंडई परिसरातील रुग्णांच्या राहत्या घराच्या व व्यापाराच्या ठिकाणी जवळपास साडे सातशे मीटर एरिया पूर्ण सील केला असून त्यांचा आजिबात बाहेर संपर्क येणार नाही, अशी दक्षता घेण्यात आली आहे. 29 ते 31 मार्च दरम्यान शहर पूर्ण लॉकडाऊन केले आहे. कोरोनाबधित परिसरात वीस फूट उंचीचे दोन मनोरे उभारण्यात आले आहेत. प्रत्येकी चार स्पीकर बसवले आहेत. त्याद्वारे लोकांचे प्रबोधन, जागरुकतेविषयी मार्गदर्शन, भजन आदींचा वापर करून लोकांच्या मनातून भीती निघून जावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकांमध्ये त्यामुळे समाधानकारक भावना आहेत. नगरसेवक अमित ओसवाल यांनी सांगितले की, "नागरिकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कोरोना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सतत घरी राहून कंटाळवाणी होणारी मानसिकता विचारात घेऊन पदाधिकारी आणि प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT