saho came a home 
पश्चिम महाराष्ट्र

श्राद्ध झाले, नि तो प्रकटला.. असं कसं झालं

संजय आ. काटे

श्रीगोंदे: रस्त्याच्या कडेला तो जखमी झालेला मुलगा निपचिप पडून होता. व्यायामाला जाणाऱ्या तरुणांच्या तो नजरेत पडला आणि त्याच्या जखमांवर इलाज केला. त्या मुलाकडून त्याच्या गावाचे नाव कळत होते बाकी काहीच नाही. मढेवडगाव (ता. श्रीगोंदे) येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे व त्यांच्या मित्रांनी मुलाला घरी नेले. अक्षय ससाणे व इतर मित्रांच्या मदतीने गावातील डॉ. प्रवीण नलगे यांच्या दवाखान्यात नेले. डॉ. नलगे यांनी त्याच्यावर उपचार केले. 

साळवे कुटुंबाकडून देखभाल 
साळवे यांनी तरुणाला आपल्या घरी नेत, त्याची कुटुंबातील व्यक्तिप्रमाणे देखभाल केली. विशेष करुन त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य पूजा यांनी त्याला जपले. त्याच्याशी संवाद साधत काही माहिती मिळते का ते पहिले. त्याची देहबोली व संवादावरून तो परराज्यातील असल्याचे समजले. त्याला हिंदी भाषाही निटशी बोलता येत नव्हती. मात्र, साळवे व त्यांच्या मित्रांनी त्याचा प्रत्येक संवाद गुगलवर तपासला. आणि तो छत्तीसगड राज्यातील कोरिया जिल्ह्यातील असल्याचे समजले. 

छत्तीसगडच्या एसपींचीही मदत 
तरुणांनी गुगलच्या माध्यमातून तेथील पोलिस अधीक्षक चंद्रमोहन सिंग यांच्याशी थेट संपर्क साधून घटनेची माहिती दिली. सिंग यांनी तात्काळ त्यांच्या अधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश देऊन माहिती मिळविली. हा तरुण तीन वर्षापासून बेपत्ता असल्याची नोंद तेथील पोलिस ठाण्यात होती. सिंग यांनी पोलिस कर्मचारी त्या तरुणाच्या घरी पाठवले व तेथून साळवे यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तरुणाचे घरच्यांशी त्यांचे बोलणे करुन दिले. त्यावेळी सदर तरुणासह त्याच्या घरच्यांना अश्रू अनावर झाले. त्या मुलाचा पत्ता आपण शोधला, हे पाहून यासाठी कष्ट घेणाऱ्या साळवे, अभय गुंड, प्रा. योगेश मांडे, सचिन ससाणे, सनी कोळपे, अंबादास मांडे, गोरख शिंदे, गोरख उंडे यांचेही डोळे पाणावले. 

कर्ते कुणीच नाही 
त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई व छोटी भावंडे आहेत, 80 वर्षांचे आजोबा व आजी आहेत. त्यामुळे त्याला येथे येऊन घेवून जाण्यासाठी कुणीही येवू शकत नसल्याने मढेवडगावच्या या तरुणांनी त्याला आजाद हिंद एक्‍सप्रेस या रेल्वेचे तिकीट काढून दौंड येथून बसवून दिले. त्याच्या खिशात त्यांचे मोबाईल क्रमांक, पोलिसांचे नाव व क्रमांक सगळे ठेवले. 

सोशल मीडियाचा असाही वापर 
या रेल्वेने प्रवास करणाऱ्या सोलापूरच्या एका मित्रावर त्याची जबाबदारी सोपवली. तीन दिवसांच्या रेल्वे प्रवासानंतर तो म्हणजे छोटू ओमप्रकाश साहू त्याच्या घरी पोचला आणि साळवे यांच्या व्हॉटस ऍपला तो त्याच्या आजी-आजोबाच्या कुशीत विसावल्याचे छायाचित्र मिळाले. मढेवडगावच्या तरुणांच्या चेहऱ्यावर एक चांगले काम केल्याचा आनंद दिसला. 

श्राद्धानंतर आला... 
छोटू सापडत नाही म्हटल्यावर त्याचे निधन झाले असावे, असा त्याच्या कुटुंबाचा समज झाला होता. त्याच्या वियोगातून त्यांनी छोटूचे श्राद्धही उरकले होते. मात्र, तो परतल्याने कुटुंबाला गगन ठेंगणे झाले आहे. तो गतिमंद असल्याने भरकटला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT