ST.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

दिवाळी तोंडावर तरीही तीन महिन्यांचे वेतन थकीत...एसटी कामगार सोमवारी आक्रोश आंदोलन करणार 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  दिवाळी तोंडावर आली तरीही एसटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन, भत्ते आणि सण उचल मिळाली नाही. त्यामुळे सोमवारी (ता.9) एसटी कामगार त्यांच्या घरासमोर कुटुंबासह आक्रोश आंदोलन करणार आहेत. तसेच एसटी प्रशासनाच्याविरोधात मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्यात येत असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत व सचिव नारायण सूर्यवंशी यांनी दिली. 

एसटी कामगारांना दर महिन्याला सात तारखेला वेतन देण्यात येते. परंतु सध्या ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन अद्याप दिलेले नाही. कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह ऑक्‍टोबरच्या वेतनासोबत देण्याची मागणी केली आहे. तसेच सण उचल दिवाळीपूर्वी देण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. परंतु दिवाळी तोंडावर आली तरीही अद्याप तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. 2 नोव्हेंबरला एसटी कामगार संघटनेच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. 

कायदेशीर तरतुदीनुसार वेतन नियमित तारखेला दिले नाही. महागाई भत्ता व सण उचलही दिली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांवर उधारीची वेळ आली आहे. संघटनेने 2 नोव्हेंबरला निवेदन देऊन 9 नोव्हेंबरला कुटुंबासह आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. परंतु थकीत वेतनासाठी राहत्या घरासमोर आंदोलन केल्यास कारवाई केली जाईल, अशा सूचना एसटी प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे कामगार आणि कुटुंबीयांच्या संतापात भर पडली आहे. थकीत वेतन न देता आंदोलनास मनाई करण्याच्या सूचना देऊन कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे याचाही निषेध करण्यासाठी एसटी कामगार सोमवारी (ता.9) कुटुंबीयासह आक्रोश करतील. तसेच सांगलीत विभागीय कार्यालयासमोर आणि आगाराच्या ठिकाणीही आक्रोश आंदोलन केले जाणार असल्याचे श्री. खोत व श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले. 
 

दावा दाखल करणार- 
संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना शनिवारी निवेदन दिले आहे. थकीत वेतन व भत्ता, उचल यासाठी मुंबई औद्योगिक न्यायालयात सोमवारी (ता.9) एसटी प्रशासनाविरोधात दावा दाखल केला जाणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT