Eventually the vaccine came to Sangli; 68 thousand doses to the district 
पश्चिम महाराष्ट्र

अखेर लस सांगलीत आली; जिल्ह्याला 68 हजार डोस

विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यातील उपलब्ध कोरोना लशींचा साठा संपल्याने गुरुवार (ता. 8)पासून लसीकरण ठप्प होते. मात्र, दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 68 हजार लशींचे डोस आज सकाळी आरोग्य विभागाला मिळाले. नवीन डोस मिळताच 228 केंद्रांवर त्याचे वाटप करण्यात आले. दिवसभरात 19 हजार 24 जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. पुढील दोन दिवस लसीकरणात कोणताही अडथळा येणार नाही. परंतु, प्रशासन आणखी लशींच्या प्रतीक्षेत आहे. 


कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. सध्या 45 वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाते. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला होता. आतापर्यंत जिल्ह्याला सुमारे पाच ते सहा वेळा लस मागवावी लागली होती. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 66 हजारांवर अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


तीन दिवसांपासून लशींची टंचाई निर्माण झाल्याने लसीकरण ठप्प होते. ज्याठिकाणी लस शिल्लक होती, तेथे काही प्रमाणात लसीकरण झाले. गुरुवारी दिवसभरात फक्त चार हजार 427 इतकेच लसीकरण झाले. 227 पैकी 42 केंद्रांवरच लसीकरण सुरू होते. काल (ता. 9) केवळ 692 जणांना लस देण्यात आली. उर्वरित सर्व केंद्रे बंद होती. लस नसल्याने अनेकांना विनालसीचे माघारी परतावे लागले. 


जिल्हा आरोग्य विभागाने 2 एप्रिलला शासनाकडे लस मागणीबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. पण, शासनाकडून लस नाही. लस आल्यावर पाठवितो, असे जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले होते. परंतु, आज पहाटे कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाला लशींचा डोस मिळाला. त्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी 68 हजार लशी पाठविण्यात आल्या. आरोग्य विभागाला सकाळी आठला लशी मिळाल्यावर जिल्ह्यातील 228 केंद्रांना त्याचे वाटप करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील 29 लसीकरण केंद्रांसाठी पाच हजार लशी देण्यात आल्या. 


शहरी भागासह ग्रामीण भागात लशींचे वाटप होताच तत्काळ लसीकरणाला सुरवात झाली. दिवसभरात 19 हजार 24 जणांना लस देण्यात आली. ग्रामीण भागात 16 हजार 96, शहरात 932, तर महापालिका क्षेत्रात एक हजार 996 जणांचे लसीकरण करण्यात आले. पुढील दोन दिवस लसीकरणात कोणताही अडथळा येणार नाही. शासनाकडे लशींची मागणी कायम असून, लवकरच आणखी लस मिळेल, असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT