rsm.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

प्रत्येक भुकेल्यासाठी युध्द आमुचे सुरु..!

जयसिंग कुंभार

सांगली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या विंगचा भाग असलेली राष्ट्रीय संघटन मंडळाचे जणू सध्या प्रत्येक भुकेल्याच्या तोंडात घास भरवण्यासाठी युध्दच सुरु आहे. सध्याच्या कोरोना आपत्तीत लॉकडाऊननंतर मंडळाची टीम प्रत्यक्ष रणभुमीवर उतरली असून आजघडीला 200 स्वयंसेवक भूकेल्यांच्या तोंडात घास टाकण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यावर लढत देत आहेत.

गेल्या पंधरा दिवसात सांगली आणि पंचक्रोशीतील वाड्यावस्त्यांवर पोहचत 10 हजार लोकांपर्यंत त्यांनी अन्नाचा घास भरवण्याचे पुण्यकार्य केले आहे. ही सारी मंडळी सांगली-मिरजेत सध्याच्या टाळेबंदी अडकली आहेत. त्यात रुग्ण,नातेवाईक,विद्यार्थी, परप्रांतीय मजूर, भिकारी असे अनेक आहेत. आव्हान एवढे मोठे आहे की हा अन्नदानाचा यज्ञ अखंड तेवत ठेवण्यासाठी रोज चाळीस हजारांचा खर्च येत आहे. हजारो ज्ञात अज्ञात हात ही मदत देण्यासाठी सरसावले आहेत.

संघचालक विलासजी चौथाई, कार्यवाहक नितिनराव देशमाने, राष्ट्रीय संघटन मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र तेलंग, सचिव धनंजय दीक्षित,राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांगली,मिरज,भिलवडी,जत,तासगाव अशा ठिकठिकाणी स्वयंसेवक कार्यात उतरले आहेत. सांगलीत रोज खरे मंगल कार्यालयात, गावभागात अपर्णा गोसावी, मारुती चौकात गोडबोले, मिरजेत रंगशारदा भवन या ठिकाणी जेवण तयार केले जाते. सकाळी आठपासून अकरापर्यंत जेवण तयार होते. त्यानंतर ठिकठिकाणी जेवण पोहचवणे या कार्यात ही टीम सरसावली आहे. संघाचा गणवेश हीच या कार्यकर्त्यांची ओळख आहे. या वेशात आलेल्याला वेगळी ओळख मागायची गरज नसते. सध्याच्या संचारबंदीतही ही मंडळी सकाळी सात ते रात्री बारापर्यंत रस्त्यावर आहेत आणि या अन्नयज्ञात आघाडीवर आहेत. रोज दिवसभरात सातशे ते हजार जेवणाचे संच आणि सुमारे दोनशेंवर शिध्याचे संच प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत पोहचवले जाते. समाजाच्या मदतीशिवाय हा अन्नदानाचा यज्ञ चालणे मुश्‍किल आहे.



ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांनाही मदत दिली जाणार आहे. त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. स्वयंसेवक सर्वेक्षण करून पात्र लाभार्थीपर्यंत जेवण अगर शिधा पोहचवतील. कोणीही भुकेला राहू नये हीच इच्छा आहे.''

धनंजय दीक्षित,
सचिव, राष्ट्रीय संघटन मंडळ


अन्नदानाच्या पुण्य यज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे. आता टाळेबंदीचा कालावधी वाढविल्याने हे कार्य आणखी पुढे वाढणार आहे. सध्या निधीच्या मर्यादा येऊ लागल्या आहेत. शिवाय आणखी काही स्वयंसेवकांची गरज आहे. त्यांना बाहेर काढून हे काम पुढे सुरुच ठेवले जाईल.

शैलेंद्र तेलंग
अध्यक्ष, राष्ट्रीय संघटन मंडळ


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT