Everyone has a responsibility to save the historic Lakshmi Market 
पश्चिम महाराष्ट्र

ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची

प्रमोद जेरे

मिरज : शहरातील प्रमुख ऐतिहासिक वास्तू असलेल्या लक्ष्मी मार्केटच्या इमारतीचे महत्व जपण्याची जबाबदारी आता मिरजेच्या प्रत्येकाची आहे. महापौरांनी या इमारतीच्या दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले असले; तरी एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. तर या सुंदर ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी ऐतिहासिक तज्ज्ञांची मदत घेण्यासह येथील समाजकंटकांचा उपद्रव थांबवून इमारतीस पूर्वीचे सौंदर्य प्राप्त करुन द्यावे लागणार आहे. 

तत्कालिन संस्थानिकांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने 1932 मध्ये दीड लाख रुपयांचे कर्जरोखे काढून हे लक्ष्मी मार्केट बांधले. एक दोन रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतचे कर्जरोखे काढून त्याची गुंतवणुकदारांना व्याजासह परतफेडही संस्थानिकांनी केली. विश्वनाथ बेडेकर या हुशार इंजिनिअरनी या इमारतीचा आराखडा तयार केला आणि गणपतराव जाधव (सध्याच्या अमृत योजनेचे ठेकेदार शशांक जाधव यांचे आजोबा) या अतिशय प्रामाणिक ठेकेदारांनी याची केवळ दोन वर्षांत उभारणी केली. 

1930 मध्ये या मार्केटची पायाभरणी तत्कालिन संस्थानिक श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांच्या हस्ते झाली; तर उदघाटन सांगलीचे तत्कालिन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या हस्ते झाले. आतील बाजुस भाजी विक्रेते, बाहेर बाजूस कपडे, किराणा माल, शेती बियाणे यासह अन्य ग्राहकोपयोगी वस्तुंची दुकाने, दुसऱ्या मजल्यावर कचेरी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टोलचे घड्याळ यासह अनेक सुविधा या मार्केटमध्ये करण्यात आल्या आहेत. 

दगड चुन्यात बांधलेल्या या इमारतीची सध्याची अवस्था मात्र अतिशय दयनिय आहे. गेल्या दहा वर्षात या मार्केट दुरूस्तीसाठी दीड ते दोन कोटी रुपये खर्च झालेत. त्यातूनही हे मार्केट वाचले हे महत्त्वाचे. अन्यथा या मार्केटच्या आसपासचेच महापालिकेतील कारभारी लक्ष्मी मार्केटचा बाजार करण्यासाठी टपलेले आहेत. त्यांचे मनसुबे पुर्णत्वास जाणार नाहीत, याची दक्षता घेऊनच व्यापारी आणि इतिहासप्रेमी नागरिकांना या ऐतिहासिक वास्तुचे जतन होण्यासाठी दुरूस्तीच्या कामावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

मिरजचे लक्ष्मी मार्केट हेच मिरजेचा सिम्बॉल आहे. दूरदृष्टीने अभ्यासपूर्ण आर्थिक आणि तांत्रिक नियोजनाने या इमारतीची त्याकाळी उभारणी करण्यात आली. इंजिनियर विश्वनाथ बेडेकर आणि ठेकेदार गणपतराव जाधव यांनी परिश्रमपुर्वक उभारलेल्या या ऐतिहासिक वास्तूची सध्याची अवस्था दयनीय आहे. या मार्केटची जपणूक करणे महापालिकेचेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. 
- मानसिंगराव कुमठेकर, संस्थापक. मिरज इतिहास संशोधक मंडळ 

लक्ष्मी मार्केट हे मिरजेची शान आहे. तिची जपणूक हे आपले कर्तव्य आहे. आमचा पुढाकार हा व्यापारी म्हणून नव्हे, तर जबाबदार नागरिक म्हणून आहे. 
- विराज कोकणे, अध्यक्ष मिरज व्यापारी असोसिएशन 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT