one arrested for burglary; 8 crimes uncovered 
पश्चिम महाराष्ट्र

कोंबड्यांपासून सोन्यापर्यंत सारं चोरलं... बेळंकीत अट्टल चोरट्यास जेरबंद; 8 गुन्हे उघडकीस

घनशाम नवाथे

सांगली : पोल्ट्रीतील कोंबड्यापासून ते मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सोन्याचे दागिने रोकड अशा अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारा अट्टल चोरटा युवराज ऊर्फ शंकर ईश्वरा भोसले (वय 19, सरकारी वसाहत, बेळंकी ता. मिरज) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, होम थिएटर, मोबाईल, दुचाकी असा 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

अधिक माहिती अशी, जिल्ह्यातील चोऱ्या, घरफोड्या, मंदिर चोरी, जबरी चोरी यासारखे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी खास पथक तयार केले आहे. पथकातील सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत आणि कर्मचारी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करताना पोलिस कर्मचारी विकास भोसले यांना बेळंकी (ता. मिरज) येथे भगवा चौकात शंकर भोसले हा दुचाकीवरून मोबाईल कमी किमतीत विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिकडे धाव घेतली. भगवा चौकातून मिरजकडे जाणारे रस्त्यावर शंकर भोसले याला जागीच पकडले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर दोन मोबाइल मिळून आले. 

कसून चौकशीत त्याने दुचाकी विशाल आनंदराव काळे (रा. एरंडोली ता. मिरज) यांची असल्याची सांगितले. तसेच महिन्यापूर्वी साथीदारासह ढवळी (ता. मिरज) येथील ऊसतोड कामगारांच्या झोपडीतून एक मोबाईल, एक सोन्याचे मणीमंगळसूत्र व बदाम, चांदीच्या मनगट्या चोरल्याचे सांगितले. 
अधिक चौकशीत लिंगनूर शाळा येथील सतरंजी व स्पीकर, बेडग रस्ता चुना भट्टीजवळील पोल्ट्रीमधील कोंबड्या, मालगाव येथील इलेक्‍ट्रॉनीक्‍स दुकानातील होम थिएटर व रोख रक्कम, मल्लेवाडी येथील दोन दुकानांतील रोख रक्कम, गुंडेवाडी येथील पाच दुकानांतील रोख रक्कम, बेळंकी तलाठी कार्यालयात रोख रक्कम, मिरज-पंढरपूर रस्त्यावरील मळ्यातील घरामधील एका महिलेच्या कानातील सोन्याची फुले चोरल्याचे सागितले. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, होमथिएटर, संतरजी, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिस कर्मचारी सुधीर गोरे, संजय कांबळे, सचिन कुंभार, जितु जाधव, हेमंतकुमार ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, रंजना कलगुटगी, शुभांगी मुळीक, अरुण सोकटे, कॅप्टन गुंडवाडे, प्रकाश पाटील यांनी कामगिरी केली. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT