ex mayor of atpadi panchayat committee aslam shaikh dead today in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : आटपाडीचे माजी सभापती उस्मान शेख यांचे वृद्धापकाळाने निधन

सदाशिव पुकळे

झरे (सांगली) : घरनिकी (ता. आटपाडी) येथील खानापूर - आटपाडी तालुक्याचे ज्येष्ट नेते आणि पंचायत समिती आटपाडीचे माजी सभापती उस्मान नबी शेख यांचे सांगली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते बाबासाहेब देशमुख सह. सुतगिरणीचे माजी व्हा. चेअरमन तसेच पश्चिम भागातील सक्षम नेतृत्व म्हणून एॅडवोकेट उस्मान शेख यांचा नावलौकिक होता. ते 86 वर्षाचे होते. त्यांनी जात, पात, धर्म असा भेद न करता निधर्मी माणूस म्हणून संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, मुले, भाचे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आटपाडी - खानापूर तालुक्यातील राजकीय, सामाजीक क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. घरनिकी येथे आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी केला जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Fertility Rate Decline : भारताचा जन्मदर घटला, इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; लोकसंख्या संकटाची चाहूल?

राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब, पुतण्याला मंत्रिपदाची चर्चा; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेसाठी निर्णय

सरकारी बाबूची २७ वर्षे नोकरी; ३ टोलेजंग इमारती, २ आलिशान बंगले, १३ प्लॉट; २ कोटींची रोकड, सोने-चांदी अन् जमिनीची मोजणी बाकी

Nagpur: विकास हवाच, पण पर्यावरणही जपणे आवश्यक; सिमेंटीकरण, प्रदूषण व वृक्षतोडीमुळे उपराजधानीचा पारा ‘हाय’

Latest Marathi News Live Update : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान

SCROLL FOR NEXT