Sangli Crime 
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : डोक्यात लोखंडी रॉड घालून माजी सैनिकाचा खून; धाब्यावर जेवायला गेल्यावर वाद झाला अन्...

Tasgaon Police : गणपती शिंदे हे भारतीय सैन्य दलातून सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी रहातात.

सकाळ डिजिटल टीम

गणपतराव शिंदे हे बुधवारी रात्री गावातील एका धाब्यावर जेवायला गेले होते. तेथे त्यांनी एकाबरोबर मद्यप्राशन केले होते. त्या ठिकाणी वादावादी झाली होती.

तासगाव : नवी डोर्ली फाटा, बलगवडे (ता. तासगाव) येथे बुधवारी (ता. २५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माजी सैनिक (Ex Soldier) गणपती धोंडिराम शिंदे (वय ६५) यांचा राहत्या घरात डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून (Tasgaon Police) मिळालेली माहिती अशी की, गणपती शिंदे हे भारतीय सैन्य दलातून सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी रहातात. त्यामुळे सध्‍या नवी डोरली फाटा, बलगवडे येथील स्वतःच्या घरात एकटेच राहत होते. काल सकाळी त्यांचा खून झाल्याचे झाल्याचे उघड झाले.

हल्लेखोरांनी त्यांना मारल्यानंतर लोखंडी रॉड तेथेच टाकून त्यांची चारचाकी गाडी (एमएच १०, डिजी ४१०५) घेऊन पसार झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अमित गणपती शिंदे यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनीही घटनास्थळी भेट दिली.

गणपतराव शिंदे हे बुधवारी रात्री गावातील एका धाब्यावर जेवायला गेले होते. तेथे त्यांनी एकाबरोबर मद्यप्राशन केले होते. त्या ठिकाणी वादावादी झाली होती. त्या संशयितानेच खून केला असावा, असा अंदाज असून, त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्या संशयितास पोलिसांनी पळवून नेलेल्या गाडीसह ताब्यातही घेतले आहे. याप्रकरणी त्या संशयिताकडे कसून चौकशी सुरू असून, अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

Indian Student Crime: २० वर्षीय भारतीय तरुणानं गर्लफ्रेंडला संपवलं, अमेरिकेतून जर्मनीला पळाला; विमानतळावर उतरताच अटक

जे बात! हात हातात येणार, शरूच्या प्रेमात शायनरची विकेट पडणार; 'सनई चौघडे' मध्ये नवा ट्विस्ट, प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT