the exam of 12th and 10th time table is declared by education department in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावत दहावी, बारावीचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

मिलिंद देसाई

बेळगाव : दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. मात्र शाळा व पदवी विद्यालये सुरु झाल्याशिवाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक संभ्रमावस्था निर्माण होईल असे मत शिक्षक व प्राध्यापकांमधुन व्यक्‍त होऊ लागले आहे. 

शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी पुढील आठवड्‌यात दहावी व बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जुन किंवा जुलै महिन्यात परीक्षा होण्याची शक्‍यता आहे. मात्र शाळा कधीपासुन सुरु होणार याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे शाळा व विद्यालये सुरु होण्याअगोदरच वेळापत्रक जाहीर करण्यात आले तर कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वर्षात एक दिवसही शाळेत न आलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे अवघड जाणार आहे.

तसेच दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाची परीक्षा आहे. याचा विचार शिक्षण खात्याने करणे आवश्‍यक आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फक्‍त विद्यागम योजनेअंतर्गत फक्‍त काही दिवस शिकविण्यात आले आहे. त्यामुळे काही दिवस शाळा सुरु झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर करण्यात आले तर अधिक चांगले होईल असे मत व्यक्‍त होत आहे.

"शाळा अजुन सुरु झालेल्या नाहीत त्यामुळे अगोदरच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तर अभ्यासापासुन दुर असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढणार आहे. याचा विचार शिक्षण खात्याने करणे आवश्‍यक असुन शाळा कधीपासुन सुरु होतील याप्रमाणे वेळापत्रक तयार केले पाहीजे तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना अवघड जाणार नाही."

 - बी. आर. बुवाजी, मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कुल 


"पदवी विद्यालये अद्याप सुरु झालेली नाहीत त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासुन दुर आहेत. त्यामुळे विद्यालये अगोदर सुरु होणे आवश्‍यक असुन शिक्षक व विद्यार्थी यांचा सर्व प्रथम संवाद होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत घाई करण्याऐवजी विद्यालये सुरु झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले तर अधिक चांगले होईल."

- प्रा. अरविंद पाटील, ताराराणी पदवीपुर्व महाविद्यालय

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT