explosion of chemical liquid barrel Death of worker  sakal
पश्चिम महाराष्ट्र

कुपवाडला केमिकलच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू

औद्योगिक वसाहतीतील कंपनीत केमिकल लिक्विड बॅरेलच्या स्फोटात जखमी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली

सकाळ वृत्तसेवा

कुपवाड : औद्योगिक वसाहतीतील कंपनीत केमिकल लिक्विड बॅरेलच्या स्फोटात जखमी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राहुल बाजीराव नंदिवाले (वय 25 रा.सुभाषनगर मिरज) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबतची नोंद कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत राहुल नंदीवाले हा युवक कुपवाड औद्योगिक वसाहतीतील सुयश कास्टिंग प्रा.ली या कंपनीत वेल्डर म्हणून काम करत होता. बुधवारी कंपनीत काम करत असताना तेथे असणाऱ्या एका केमिकल लिक्विड बॅरेलचा स्पोफ्ट झाला. दुर्घटनेत राहुल हा जखमी झाला. त्याचे शरीर नव्वद टक्के भाजले. याचवेळी याचवेळी कंपनीचे इंचार्ज निखिल सुतार यांनी राहुल यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद कुपवाड पोलिसांत झाली आहे. अधिक तपास हवालदार एकनाथ करांडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT