truck 
पश्चिम महाराष्ट्र

डोंगर फोडणाऱ्या ट्रकचा स्फोट; एक ठार, दोन जखमी; तासगाव तालुक्‍यात घटना 

Ravindra Mane

तासगाव (सांगली) ः तासगाव शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावळज परिसरातील डोंगर फोडण्याचे काम करणाऱ्या दोन ट्रकचा भीषण स्फोट झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

अचानक आग लागल्याने स्फोट झाला, त्याचे नेमके कारण समजू शकले नाही. या स्फोटाचा आवाज आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत आला. आगाची लोळ उठले, दूर दूरवरून दिसत होता. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण होते. 


सावळज व बलबवडी गावालगत असलेल्या डोंगरात दगड फोडण्याचे काम सुरु होतो. स्फोट घडवून मुरून काढण्याचे काम सुरु होते. त्यासाठी दोन ट्रक तेथे काम करत होते. त्यात दुपारी चारच्या सुमारास आग लागली आणि काही क्षणात प्रचंड असा स्फोट झाला. त्याचा आवाज इतका मोठा होता की सारे हादरून गेले. आगीचे लोळ उठले. लोक घाबरले. शेतात काम करणाऱ्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काय झाले आहे, समजायला साधन नव्हते. अखेर धुराच्या दिशेने धाव घेत अग्निशमक दलाच्या वाहनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार, एकाचा बळी गेला असून दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यातून शतक करणाऱ्या जैस्वालला डच्चू, तर विराट कोहलीबाबत काय झाला निर्णय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

SCROLL FOR NEXT