Crime
Crime 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात सापडली स्फोटके

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - स्फोटके बनविण्यासाठी लागणाऱ्या १४ डिटोनेटरसह इतर साहित्य पोलिसांनी सोमवारी पहाटे जप्त केले. भय्या चौकातील नरसिंग गिरजी मिल कंपाउंड परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात मध्य प्रदेशातील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत ते खाणकामगार असल्याची माहिती समोर आली आहे. या पाच जणांचा दहशतवादी अथवा नक्षलवादी संघटनांशी संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे. 

गजरूप मनमोहन अगरीया (वय २९), मोहीत गन्नसिंग मरावी (वय २०), बहादूरसिंग सुखराम बेगा (वय १९, सर्व रा. मध्य प्रदेश) यांच्यासह इतर दोघा अल्पवयीन तरुणांवर स्फोटके बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून रेल्वेने गजरूप अगरीया व त्याचे साथीदार रविवारी सोलापुरात आले होते. सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास भय्या चौकातील नरसिंग गिरजी मिल कंपाउंड परिसरात ते संशयास्पदरीत्या पोलिसांना सापडले. रात्रगस्तीवर असलेले सहायक पोलिस निरीक्षक गोविंद पांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच जणांची चौकशी केली. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली. त्यांच्याकडे स्फोटके बनविण्यासाठीचे १४ डिटोनेटर सापडले.

संशयास्पदरीत्या ताब्यात घेतलेले पाच जण खाणकामगार आहेत. त्यांच्याकडून स्फोटके बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे विविध ठिकाणची तिकिटेही सापडली आहेत. विजयवाडा येथे जाऊन त्यांच्याबाबत सोलापूर पोलिसांचे पथक खात्री करणार आहे.
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT