exportation of rose from kolhapur is reduced 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरी गुलाब परदेशांत स्वस्त, भारतात महाग... कसं काय ?

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर - सहजपणे कोणाला पटणार नाही, पण कोल्हापुरातल्या गुलाब फुलाला परदेशी बाजारपेठेत मागणी आहे. यंदा मात्र परदेशी बाजारपेठेत गुलाबाला मागणी असली, तरी त्या तुलनेत दर कमी मिळत असल्याने गुलाब उत्पादकांनी परदेशी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. याउलट भारतातील बाजारपेठेची स्थिती आहे. परदेशी बाजारपेठेत ३ ते ६ रुपयांनी विकले जाणारे गुलाब फूल भारतातच ४ ते ८ रुपयांना विकले जाते. यात कोल्हापुरी गुलाबाला पसंती मिळत आहे. त्यामुळे हा गुलाब परदेशांत यंदा जपूनच जाईल, तर कोल्हापूरसह भारतात भरभरून विकला जाईल, असा अंदाज श्रीवर्धन बायोटेकचे रमेश पाटील यांनी व्यक्त केला.

अमेरिकेलाही जातो कोल्हापुरी गुलाब

दरवर्षी कोल्हापुरात उत्पादित होणाऱ्या विविध जातींच्या गुलाबाला परदेशांत चांगला दर मिळतो. साधारण ऑगस्टपासून मार्चपर्यंत परदेशी बाजारपेठेत गुलाबाला मागणी असते. जपान, लंडन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत हे गुलाब पाठवले जातात. यात लाल, गुलाबी, केशरी, पांढऱ्या व पिवळ्या गुलाबाला अधिक मागणी असते. यंदा मात्र भारतातील वादळ परिस्थिती, लांबलेला पाऊस यामुळे गुलाबाचे उत्पादन घटले. परिणामी गुलाबाचा दरही वधारला. परदेशांत निर्यात करावी लागत असल्याने गुलाब पाठविण्याचा खर्च येतो. त्यातुलनेत भारतातच चांगला दर मिळाल्यामुळे गुलाबाला स्थानिक बाजारपेठेत ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.  

व्हॅलेंटाईन्स ‘डे’ ला वाढते गुलाबाची मागणी

व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी कोल्हापुरातील गुलाबाला देशासह परदेशी बाजारपेठेत अधिक मागणी असते. फक्त जिल्ह्यातून २० लाखांपेक्षा अधिक गुलाबांची अमेरिकेसह जपान, लंडन, ऑस्ट्रेलिया या देशांत निर्यात होते. आठ रुपयांपासून ते २२ रुपयांपर्यंतचा दर मिळतो. विशेषत: लाल रंगाच्या गुलाबाला अधिक पसंती मिळते. यंदाही तसाच दर मिळण्याची शक्‍यता असल्याने व्हॅलेंटाईन्स डेलाच परदेशी बाजारपेठेत गुलाब जातील, असा विश्‍वास गुलाब उत्पादक व्यक्त करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT