The family has to go on a fast to build a toilet 
पश्चिम महाराष्ट्र

या कुटुंबाला शौचालय उभारणीसाठी करावे लागतेय उपोषण; वाचा काय आहे प्रकरण

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (जि, सांगली ) : स्वतःच्या जागेवर शौचालय बांधून दिले जात नसल्यामुळे फारूक तांबोळी यांनी कुटुंबीयांसोबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी पोलिसांनी भेट देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत ठोस निर्णय झाला नव्हता. 

येथील फारूक तांबोळी यांची स्वमालकीची जागा आहे. या जागेमध्ये ते दोन वेळा शौचालय बांधण्यासाठी गेले असता त्यांचा भाऊ इक्‍बाल तांबोळी आणि त्याच्या मुलांनी शौचालय बांधण्याला तीव्र विरोध केला. तसेच दोन वेळा मारहाणही केली होती. त्यांच्या दहशतीमुळे त्रस्त झालेल्या फारूक तांबोळी यांनी पत्नी आणि मुलांसोबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

या जागेवर शौचालय बांधण्यास विरोध करणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करून न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक बजरंग कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

उपोषणकर्ते आणि विरोध करणाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन चर्चा केली. मात्र ठोस निर्णय झाला नव्हता त्यामुळे उपोषण सुरूच होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT