Farm workers were thrown into a burnt sugarcane
Farm workers were thrown into a burnt sugarcane 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ः शेतमजुराला पेटलेल्या उसाच्या फडात फेकले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हार : ममदापूर (ता. राहाता) शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. ऊसाच्या पेटलेल्या फडात आपल्या शेतमजुरा फेकण्यात आले. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सहा जणांनी एका शेतमजुरास बेदम मारहाण केली. नंतर गळा आवळून त्यास पेटलेल्या गवतात फेकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत लोणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अशोक रेवजी नेहे (वय 55, रा. ममदापूर) असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. वैभव योसेफ कदम, विनय वैभव कदम, अजय योसेफ कदम, अभय योसेफ कदम व अन्य दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे. 


अधिक माहिती अशी : ममदापूर येथील कांचन बहिनाजी कदम यांची दीड एकर शेती अशोक नेहे वाट्याने कसतात. त्यांच्या शेतीशेजारीच आरोपींची शेती अाहे. त्यात त्यांची द्राक्षबाग आहे. रविवारी (ता. 23) दुपारी नेहे शेतात गेले होते.

फड त्यांनीच पेटवला होता

मशागतीसाठी त्यांनी शेतातील गवत पेटवून दिले. गवताने एकदम पेट घेतल्याने आग नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे आरोपींच्या द्राक्षबागेतील काही झाडांचे नुकसान झाले. त्या रागातून वरील आरोपींनी नेहे यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी, तसेच लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. नंतर गळा दाबून पेटलेल्या गवतात फेकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

 
नेहे यांच्या खिशातील 3300 रुपये, मोबाईल, एक तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकूण 34 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास केला.

आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत, नेहे यांनी तेथून पळ काढला. आगीत त्यांचा उजवा पाय गंभीर भाजला आहे. त्यांना तातडीने लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या नेहे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांनी मंगळवारी (ता. 25) पोलिसांत फिर्याद दिली. अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT