पश्चिम महाराष्ट्र

ऊस बिलासाठी शेतकरी सेनेचा विट्यात गुरूवारी रास्ता रोको 

सकाळ वृत्तसेवा

विटा - साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची उसाची बिले बुधवार ( ता. १८ ) पर्यंत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी सेनेतर्फे करण्यात आला आहे. विटा तहसील कार्यालयावर गुरूवारी मोर्चा व रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन शेतकरी सेनेतर्फे तहसीलदारांना दिले आहे, अशी माहिती सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांनी दिली. 

सन २०१६ - १७, २०१७ - १८ व २०१८ - १९ या गळीत हंगामातील उसाची बिले न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. २०१८ - १९ हंगामातील केन अॅग्रो रायगांव, गोपुज शुगर गोपूज, यशवंत नागेवाडी या कारखान्यांनी तर २०१६ - १७ व २०१७ - १८ या हंगामातील माणगंगा सहकारी कारखान्याने तीन वर्षे झाली तरीही अद्याप बिले दिली नाहीत. कोणत्याही राजकीय नेत्यास बिलाचे देणे - घेणे नाही. यासाठी शेतकरी सेनेतर्फे नऊ सप्टेंबररोजी ऊस परिषद घेऊन हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सन २०१८ - १९ च्या ऊस बिलाची रक्कम आठ दिवसात मिळावी, असा ठराव केला. पण या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या पैशांना चुना लावण्याचा उद्योग सुरू केला आहे. बुधवार ( ता. १८ ) पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत, अन्यथा शेतकरी सेनेतर्फे मोर्चा काढून शिवाजी चौकात दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे ठिगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT