farmer will be protest against people leaders home 
पश्चिम महाराष्ट्र

लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानापुढे शेतकरी का करत आहेत आंदोलन?

महेश काशीद

बेळगाव : भूसुधारणा कायदा आणि एपीएमसी दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी येत्या 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानापुढे आंदोलन करणार असल्याची माहिती आज शेतकरी संघटनेचे नेते चुनाप्पा पुजारी यांनी दिली. तसेच 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज शेतकरी जमले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्याची पुढील दिशा आणि त्याचे स्वरुप याची माहिती दिली. राज्य आणि केंद्राच्या धोरणांना शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत. त्याचे प्रतिनिधीक उदाहरण म्हणजे भूसुधारणा कायदा आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आहे.

शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन काढून घेऊन त्या कार्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये घालण्याचे नियोजनबध्द षडयंत्र सुरु आहे. हा कायदा शेतकरी विरोधी आहे. कार्पोरेट कंपन्या आणि लोकप्रतिनिधींना अनुकूलतेसाठी कायदा आणला जात आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकरी विरोधी भुमिकेला आक्षेप घेत त्याविरोधात लोकशाही पध्दतीने लढा देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती पुजारी यांनी दिली. 

पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 12 ऑगस्टला सुरवात होईल. पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानापुढे शेतकरी आंदोलन करतील. 13 ऑगस्टला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या निवासस्थाना समोर आणि 14 ऑगस्टला केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निवासस्थापुढे आंदोलन केले जाईल.

जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींच्या निवास्थानापुढे हे आंदोलन केले जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे शेतकरी आंदोलन करतील. शेतकरी विरोधी धोरणांकडे शासनाचे लक्ष वेधणे व सुधारीत कायद्यांना आक्षेप घेणे, हा उद्देश आंदोलनाचा आहे.

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 1 एप्रिलला बँका सुरू की बंद? बँकेत जाण्याआधी RBI काय सांगते नक्की जाणून घ्या

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Anand Mahindra: लोक हसले, पण तो काम करत राहिला! एका मुलाने स्वच्छ केली संपूर्ण नदी, आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : माजी खासदार हेमंत गोडसे वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT