basavaraj bommai
basavaraj bommai Sakal
पश्चिम महाराष्ट्र

'शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी 10 हजार कोटी'

सकाळ वृत्तसेवा

शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात कर्नाटकचा आदर्श असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले.

हुक्केरी : विकासकामात हुक्केरी मतदार संघ आदर्श आहे. संगम बॅरेजला नवीन पाणी उपसा योजना देण्यास सरकार कटीबद्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना वैज्ञानिक शिक्षण देण्यासाठी कृषी महाविद्यालय सुरु होत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात कर्नाटकचा आदर्श असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले. येथील नवीन हायटेक बसस्थानक, विविध विकासकामांचे उदघाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती होते.

यावेळी मंत्री बोम्मई म्हणाले, 20 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 10 हजार कोटींचे अनुदान राखीव ठेवले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या मुलांना होणार आहे. परिवहन मंत्री बी. रामलू म्हणाले, मंत्री बोम्मई यांनी कर्नाटकाच्या विकासाला चालना दिली आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. वाहतूक खात्यात बदल केला जाणार आहे.

नगराभिवृद्धी मंत्री बी. ए. बसवराज, विधानपरिषद मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ, खासदार अण्णासाहेब जोल्ले, परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ए. एस. पाटील, विकास निगमचे अध्यक्ष दुर्योधन ऐहोळे, विधान परिषद सदस्य हणमंत निराणी, नगराध्यक्ष आण्णाप्पा पाटील, बेळगावचे प्रदेश आयुक्त अम्लन आदित्य बिस्वास यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री बोम्मई यांचा नगरपालिकेतर्फे सत्कार झाला. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वागत केले. बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी प्रास्ताविक केले. प्रांताधिकारी रवींद्र करलिंगण्णावर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT