seed.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सोयाबिन, कडधान्य बियाणे घरचे वापरण्याकडे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेला मान्सुन पूर्व आणि त्यानंतर निसर्ग चक्री आंदोलनात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मान्सुनही वेळेवर सुरु होणार असल्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांनी खते, बियाणांची जुळवाजुळव सुरु केली आहे. कोरोना पार्श्‍वभूमिवरही खते, बियाणे पुरेसे उपलब्ध आहे. मंदिच्या परस्थितीत शेतकरीच आपल्या घरचे बियाणे प्रक्रिया करुन पेरणीसाठी वापरण्याच्या तयारीत आहे. यात सोयाबीन, भूईमूग, उडीद, चवळी अशा कडधान्यांचा समावेश आहे. 

यंदा वेळेवर मॉन्सुन दाखल होणार असल्यामुळे खरीपपूर्व मशागती संपल्या आहेत. खते व बियाणे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मृग नक्षत्रातच यंदा पाऊस सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांकडून बीयाणांची जुळवाजुळव सुरु केली आहे. बाजारपेठांत चौकशी अन्‌ खरेदी सुरु केली आहे. बचत गटांच्या मागणीनुसार खते व बियाणे बांधावर दिली जात आहेत. जून व जुलैत पाऊसात खंड पडण्याच्या अंदाजाने कमी कालावधीची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. खरीपपूर्व मशागतीत शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

मशागतीची कामे संपवून खते आणि उन्हाळी पाळी घालण्यात मग्न आहेत. बाजारात खत, बियाणे दाखल झाली आहेत. संकरित, सुधारित आणि संशोधित केलेल्या वाणांचा समावेश आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे अगदी मृगनक्षत्राला दमदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. 

कृषी विभागाने शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकाऱ्यांने शेतकऱ्यांच्या बांधावर खते देण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात 33 शेतकरी गट 14 शेतकरी कंपन्या आहेत. वाळवा आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात एक हजार टनाहून अधिक खत बांधावर दिले आहे.

यंदा चांगल्या पावसामुळे खरीपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरुन कृषी विभागाने 52 हजार 853 क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यात महाबीज 21 हजार 241 क्विटल व खासगी कंपन्यांकडून 31 हजार 612 क्विटल बियाणे उपलब्ध करुन दिले आहे. त्यातील साठ टक्के बियाणे उपलब्ध झाले आहे. खरीप हंगामासाठी मागणी केलेल्या बियाणांत संकरीत ज्वारी, संकरीत बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन, वाटाणा, तागाच्या बियाणांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाणांची अडचण भासू नये, यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. 

यंदा खरीपाचे सरासरी 3 लाख 48 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे.सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर होतो. शिराळा तालुक्‍यात भात पिकाचे क्षेत्र असते. येथे सध्या धुळवाफेवर पेरणी सुरु आहे. वारणा, कृष्णा नदीकाठावर सोयाबीन, भूईमुग पेरणी सुरु होईल. जिल्ह्यात तृणधान्य 1 लाख 54 हेक्‍टरवर, कडधान्य 35 हजार 300 हेक्‍टरवर, अन्नधान्य 1 लाख 89 हजार 400 हेक्‍टरवर गळीत धान्य 86 हजार 700 हेक्‍टरवर पेरणी अपेक्षीत आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

SCROLL FOR NEXT