irrigation
irrigation 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी भरले पावणेदोन कोटी

सकाळवृत्तसेवा

सांगली ः सारे जग लॉकडाऊन असताना शेतकरी मात्र शिवारात प्रचंड कष्ट उपसतो आहे. त्याला घरात थांबून चालणार नाही. त्याला द्राक्षाची बाग, ऊस, भाजीपाला जगवलायच पाहिजे.

संकट कितीही आले तरी हातपाय हलवलेच पाहिजेत. या संकटात शेतकऱ्यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजना चालवण्यासाठी तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची पाणीपट्टी जमा केली आहे. पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चिकाटीने ही वसुली केली आहे. त्यामुळे 5 मार्चपासून ही योजना अखंडपणे सुरु आहे.


जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचलेच पाहिजे, असे स्पष्ट आदेश दिले होते. खासदार संजयकाका पाटील यांनी संपूर्ण योजनेचा दौरा करून पाहणी केली. अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि त्यांच्या टीमने म्हैसाळ योजनेबाबत सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली. वसुलीसाठी पाठपुरावा ताकदीने सुरु ठेवला. प्रत्यक्ष शिवारात धावणाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कंत्राटी सहकाऱ्यांनीही मोठे काम उभे केले.

शेतकऱ्यांनी या प्रयत्नाला साथ दिली. परिणामी, या संकटकाळातही म्हैसाळचे पाणी खळाळून वाहते आहे. आतापर्यंत 1 कोटी 77 लाख रुपयांची वसुली झाली आहे. हा आकडा लवकरच सुमारे अडीच कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे.
यावर्षी कमी पंप सुरु असतानाही योजना गतीने कार्यान्वित राहिली आहे. त्यामागे गेल्या वर्षभरात झालेल्या अस्तरीकरण कामाचा फायदा झाला आहे. सध्या टप्पा क्रमांक एकसाठी 16 पंप, टप्पा दोनसाठी 20 पंप, टप्पा तीनसाठी 11 पंप, टप्पा चारसाठी 12 पंप, टप्पा पाचसाठी 6 पंप, टप्पा 6 अ ला तीन पंप, डोंगरवाडी योजनेसाठी 3 पंप, गव्हाण योजनेवर 3 पंप तर आगळगाव जाखापूर योजनेवर एक पंप सुरु आहे.

मिरज तालुक्‍यासाठी 740 दशलक्ष घनफूट पाणी उचलण्यात आले आहे. या तालुक्‍यातून 87 लाखांची वसुली झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात 468 दशलक्ष घनफूट पाणी उपसले असून 31 लाखांची वसुली झाली आहे. तासगावसाठी 141 दशलक्ष घनफूट पाणी उपसा झाला असून 21 लाख रुपयांची वसुली झाली आहे. जत तालुक्‍यात 834 दशलक्ष घनफूट पाणी उपसण्यात आले असून 36 लाखांची वसुली करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT