The Farmers rushed when polce came at Madgyal Market 
पश्चिम महाराष्ट्र

एकाचे बोकड, शेळी दुसऱ्यांनी पळवली; माडग्याळ बाजारात चेंगराचेंगरी

दत्तात्रय सावंत

माडग्याळ (जि. सांगली) : बंदी असूनही भरलेल्या माडग्याळ येथील आठवडा बाजारात पोलिस आल्याने शेतकरी शेळ्या-मेंढ्या घेऊन सैरभैर धावू लागले. यामुळे येथे चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात काही शेतकऱ्यांची बोकड, शेळी दुसऱ्यांनी पळवल्याचे प्रकार घडल्याची चर्चा होती. 


माडग्याळ येथे बाजार समितीच्या आवारात प्रत्येक शुक्रवारी येथे शेळ्या-मेंढ्यांचा सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मोठा बाजार भरतो. या भागातील माडग्याळ मेंढी देशात प्रसिद्ध आहे. होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते. बोकड व मेंढ्यांना यावेळी चांगला दर मिळतो. आज धूलिवंदनाचा शेवटचा बाजार होता. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बाजार बंदचे आदेश दिले आहेत.

मात्र बऱ्याच मेंढपाळांना व शेळीपालन करणाऱ्यांना बाजार बंद असल्याची माहिती नव्हती. आपल्या शेळ्या-मेंढ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून आज शेतकरी शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी सकाळी सहा वाजल्यापासून बाजारात येत होते. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी आपला खाक्‍या दाखवला होता.

त्यामुळे पोलिसांना पाहून शेळ्या- मेंढ्या घेऊन शेतकऱ्यांची धावाधाव झाली. मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. काही शेतकरी तारेच्या कुंपणातून पळू लागले. त्यामध्ये काही शेतकऱ्यांची बोकड, शेळी दुसऱ्यांनीच पळविल्याची जोरदार चर्चा चालू होती. पोलिसांनी पोलिस व्हॅनमधून बाजार बंद आहे, असे सांगितले असते, तर अशी चेंगराचेंगरी झाली नसती, असेही बोलले जात होते. 

बाजार बंद असल्याचे सांगण्यासाठीच पोलिस गेले

पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे दहशत केली नाही. शेतकऱ्यांना बाजार बंद असल्याचे सांगण्यासाठीच पोलिस त्या ठिकाणी गेले होते. 
- नामदेव दांडगे, फौजदार, उमदी 

बाजार बंद ठेवून व गेटला कुलूप लावू

माडग्याळ शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात कोणतेही खरेदी-विक्री केली नाही. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बाजार बंद ठेवून व गेटला कुलूप लावू. 
- सोमनिंग चौधरी, सहाय्यक सचिव, दुय्यम बाजार आवार, जत 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT