Train 
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वे विद्युतीकरणाचा "फास्ट ट्रॅक'

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : मिरज ते लातूरदरम्यान रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता कुर्डुवाडी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात साहित्य आलेले आहे. गेल्या काही कालावधीत रेल्वेची आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. पुणे ते सोलापूर आणि मिरज ते लातूर या मार्गाचा विचार करता, कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाचे सर्वच दृष्टिकोनातून महत्त्व आणखी वाढले आहे.

विद्युतीकरणाचा फायदा यादरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना
प्रवाशांचा सुरक्षित, सुखकर आणि कमी वेळात प्रवास व्हावा यासाठी दुहेरीकरणाचे काम होणे गरजेचे होते. त्या दृष्टीने वडशिंगे, कुर्डुवाडी, ढवळस, केम, भाळवणी या पाच रेल्वे स्थानकांदरम्यानचे सुमारे 34 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होऊन या ठिकाणी संगणकीकृत इलेक्‍ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या अद्ययावत प्रणालीचा प्रारंभ 28 ऑगस्ट 2019 रोजी झाला. दरम्यानच्या काळात विद्युतीकरणाचे कामही सुरू करण्यात आले. त्याबाबत परीक्षण करण्यात आले. रेल्वे रुळाच्या बाजूला खांब उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले. मिरजकडून ढालगावपर्यंत विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ढालगावपासून सांगोलापर्यंत वायर टाकण्याचे काम सुरू असल्याचे समजते. तेथून कुर्डुवाडी मार्गे लातूरच्या दिशेने काम सुरू आहे. तसेच भिगवण ते सोलापूर या दरम्यानच्या कामासही सुरवात करण्यात आली आहे. या विद्युतीकरणाचा फायदा यादरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना होणार आहे.

कुर्डुवाडी रेल्वे स्थानक

  • प्रवासी फलाटांची संख्या - 4
  • थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांची सुमारे संख्या - 76 (एक्‍स्प्रेस - 62 व पॅसेंजर -14)
  • पुणे-सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या व कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या - 58
  • मिरज-लातूरच्या दिशेने धावणाऱ्या व कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या - 18
  • कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या परंतु येथे न थांबणाऱ्या गाड्यांची सुमारे संख्या - 22
  • कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दररोजची सरासरी संख्या - 4 हजार
  • कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाचे दररोजचे सरासरी उत्पन्न - सुमारे 2 लाख 50 हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT