Fasting of Tanpure's workers 
पश्चिम महाराष्ट्र

"तनपुरे'च्या कामगारांचे उपोषण

विलास कुलकर्णी

राहुरी (नगर) विविध मागण्यांसाठी डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याच्या कायम, हंगामी व निवृत्त दोनशे कामगारांनी आज सकाळी दहापासून राहुरी फॅक्‍टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

एक ऑगस्ट 2017 ते 30 नोव्हेंबर 2019दरम्यानच्या मासिक वेतनाचे नऊ कोटी, भविष्य निर्वाह निधीचे अडीच कोटी, निवृत्त कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे सहा कोटी रुपये देणे बाकी आहे. हे थकीत साडेसतरा कोटी रुपये अदा करावेत. चालू सन 2019- 2020चा गाळप हंगाम कारखान्याने उसाअभावी बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगारांना एक वर्षासाठी "ले-ऑफ' दिला आहे; परंतु कारखाना व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात "ले-ऑफ'चा कायदेशीर करार झालेला नाही. "ले-ऑफ'चा करार करार करावा, अशा कामगारांच्या मागण्या आहेत. 

देवळाली प्रवराचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, अमोल कदम यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यातर्फे उपोषणाला पाठिंबा दिला. कामगार युनियनचे सचिव भरत पेरणे, कामगार कृती समितीचे अध्यक्ष सुरेश थोरात, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, इंद्रभान पेरणे, सुनील गुलदगड, चंद्रकांत कराळे, सचिन काळे, बाळासाहेब ढोकणे, सीताराम नालकर, अविनाश गायके यांच्यासह दोनशे कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले. 

कामगार नेते सुरेश थोरात म्हणाले, की राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने मागील दोन वर्षांत कामगारांचे दहा महिन्यांचे वेतन थकविले. या कालावधीत "प्रवरा' व "गणेश' कारखान्यांच्या कामगारांनी तनपुरे कारखान्यात काम केले. त्यांचे वेतन व भविष्य निर्वाह निधीची सर्व रक्कम अदा करण्यात आली. थकीत वेतन मागितल्यावर खासदार डॉ. विखे पाटील यांनी, "आमचे संचालक मंडळ राजीनामा देईल,' असे सांगितले. 

दिवाळी सणाच्या एक दिवस अगोदर फलकावर नोटीस लिहून, कामगारांना एक वर्षासाठी "ले-ऑफ' दिल्याचे जाहीर केले; परंतु कामगार कायद्यानुसार तसा करार केला नाही. कामगारांची दिवाळी काळी झाली. कामगारांची उपासमार सुरू आहे. मागील संचालक मंडळाने जुलै 2011 ते जुलै 2017 अखेर कामगारांचे 90 कोटी रुपये थकविले. प्रत्येक संचालक मंडळ कामगारांवर अन्याय करीत आहे. श्रमाचा मोबदला मिळत नसल्याने कामगार वैफल्यग्रस्त झाले आहेत. लवकर तोडगा निघाला नाही, तर कामगार टोकाचा निर्णय घेतील. आंदोलन तीव्र होईल, असा इशारा थोरात यांनी दिला. 

कामगारांनी संयम ठेवावा 

आमच्या कालावधीतील कामगारांचे थकीत देणे अदा करण्यासाठी बांधील आहोत. यंदा कारखाना बंद आहे. त्यामुळे आर्थिक अडचण आहे. कामगारांनी दीड महिन्याचा वेळ द्यावा. तसे लेखी देण्यास तयार आहे. कामगारांनी संयम ठेवावा. आंदोलनापासून परावृत्त व्हावे. 

- उदयसिंह पाटील, अध्यक्ष, तनपुरे साखर कारखाना  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT