crime.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बापाने घातली मुलाच्या  डोक्‍यात फरशी : कडेगाव तालुक्‍यात घडला प्रकार 

सकाळवृत्तसेवा

देवराष्ट्रे (सांगली)-  मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील संतोष शंकर शिंदे (वय 35) याच्या डोक्‍यात फरशी घालून जखमी केले. हा प्रकार रविवारी (ता.14) रात्री 9 च्या सुमारास घडला. याबाबत हल्लेखोर वडील शंकर रामचंद्र शिंदे (वय 76) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, संतोष शिंदे हा वारंवार वडील शंकर यांच्याकडे घर व शेत जमिनीची वाटणी मागत होता. रविवारी रात्री 9 वाजता तो वडिलांच्या घरासमोर आला. घर आणि शेत जमिनीची वाटणी देण्याच्या कारणावरून आई वडिलांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी वडील आणि संतोष यांच्यात वादावादी झाली. यावेळी संतोष याने वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे रागाच्या भरात वडील शंकर यांनी संतोषच्या डोक्‍यात फरशी घातली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

याप्रकरणी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित शंकर शिंदे यास अटक केली आहे. आज कडेगाव येथील न्यायालयात हजार केले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक संतोष गोसावी तपास करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT