पश्चिम महाराष्ट्र

गडहिंग्लज तालुक्यातील नूलमध्ये मुलाकडून बापाचा खून

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज -  नूल (ता. गडहिंग्लज) येथे मुलाने बापाचा खून केल्याची घटना रविवारी (ता. 18) रात्री घडली. आप्पासाहेब बाबू देसाई (वय 58) असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी मुलगा सोमगोंडा देसाई (वय 30) व मेहुणा बाबासाहेब भीमगोंडा देसाई ( वय 40, रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

आप्पासाहेब याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यातूनच तो घरात येवून पत्नीबरोबर भांडण काढायचा. मारहाणही करीत असे. याबाबत त्याला वेळोवेळी सूचना दिली होती. परंतु, त्याच्यात सुधारणा झाली नव्हती. यामुळे पत्नीने मुलगा सोमगोंडाला याची माहिती दिली.

बेळगाव येथे खासगी कंपनीत नोकरीस असलेला सोमगोंडा रविवारी घराकडे आला. भाऊ बाबासाहेबलाही मुगळीहून बोलावून घेतले. सायंकाळी सातच्या सुमारास या विषयावर घरात चर्चा होत असताना जोराचे भांडण झाले. तेंव्हा रागाच्या भरात सोमगोंडाने वडील आप्पासाहेबच्या डोकीत लाकडी बांबूने मारहाण केली. त्यात आप्पासाहेब रक्तबंबाळ झाला. त्यानंतर औषधोपचारासाठी त्याला बाबासाहेबच्या मोटरसायकलवरून गडहिंग्लजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पोलिस पाटील परशराम सरनाईक यांनी पोलिसात दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT