faze two water scheme re-tendering now
faze two water scheme re-tendering now 
पश्चिम महाराष्ट्र

"फेज-2' नळजोडणीची आता फेरनिविदा

सकाळ वृत्तसेवा

नगर : शहरात सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या (फेज-2) जलवाहिनीतून नागरिकांना नवी नळजोडणी देण्यासाठी निविदांचे दर जास्त असल्याचे कारण देत महापालिकेच्या स्थायी समितीने ठेकेदाराला फेरनिविदा सादर करण्यास सांगितले आहे. स्थायी समितीच्या सभेत आज याबाबत ठराव करण्यात आला. 


सभापती मुद्दसर शेख, उपायुक्‍त सुनील पवार, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी, नगररचनाकार राम चारठणकर, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, दीपाली बारस्कर, संध्या पवार, सोनाली चितळे, मनोज कोतकर, गणेश कवडे, अमोल येवले, यंत्र अभियंता परिमल निकम, प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहेत्रे आदी उपस्थित होते. 


सभेत 28 विषय मांडण्यात आले. नवीन जलवाहिनीतून नळजोडणीसाठी एका मीटरला साडेतीन हजारांपासून चार हजार 800 रुपयांपर्यंत दराची आखणी करण्यात आली आहे. हे दर मीटरव्यतिरिक्‍त आहेत. हे दर कुणालाही परवडणारे नाहीत, असे म्हणत गणेश भोसले यांनी निविदेला विरोध केला. त्याप्रमाणे अन्य नगरसेवकांनीही या निविदा जास्त दराच्या असल्याचे सांगत सुधारणा करण्यास सुचविले. 


मुद्दसर शेख यांनी नळजोडणीसाठी कमी अंतर असल्यास कमी दर व जास्त अंतर असल्यास जास्त दर हे प्रमाण ठेवावे, अशी सूचना मांडली. यावर "सर्वांना नळजोडणी द्यायची असेल तर होलसेलचे दर ठेवा, रिटेलचे नको,' अशा शब्दांत भोसले यांनी निविदेचा दर फेटाळून लावला. महापालिकेतील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणास दिरंगाई होत असल्याने संबंधित ठेकेदाराचा ठेका काढून फेरनिविदा काढण्याचेही सभेत ठरविण्यात आले. या कामासाठी एक कोटी रुपयांची निविदा असून, आतापर्यंत 55 लाख रुपयांची बिले देण्यात आली आहेत. 


बुरुडगाव कचरा डेपोतील मृत जनावरांसाठी विद्युत दाहिनीचा विषय चर्चेत आला. त्यावर कचरा डेपोत मृत जनावरांच्या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी व माशा झाल्याचे भोसले यांनी निदर्शनास आणून दिले. 

बाकडे गायब 
शहरात मोठ्या प्रमाणात बाकडेवाटप झाल्याचे बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडून सांगण्यात आले. त्यासाठीची बिलेही अदा करण्यात आली आहेत. यावर गणेश भोसले यांनी, "प्रभाग 14मध्ये कुठे बाकडे बसविले आहेत, ते सांगा. मला एकही बाकडे पाहायला मिळाले नाही,' असा आरोप करत बाकड्यांचा लिखित हिशेब मागितला. 

बल्लाळांचा गौप्यस्फोट 
विनायकनगर व साईनगर भागातील उद्यानांत पथदिवे बसविले जात नसल्याबाबत गणेश भोसले यांनी चिंता व्यक्‍त केली. त्यावर इलेक्‍ट्रिक विभागातील कारभाराचा गौप्यस्फोट करत अभियंता कल्याण बल्लाळ म्हणाले, ""या विभागात 50 मीटर वायर टाकून 300 मीटरची बिले ठेकेदार लावत आहेत. अशी बिले मंजूर कशी करायची?'' 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT